भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल
1 min read

भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल

Loading

भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल

मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क
शिंदखेडा प्रतिनिधी :
भडणे (ता. शिंदखेडा) या गावातील देसले कुटुंबातील तीनही भावंडांनी पुन्हा एकदा समाजातील दानशूरतेचा आदर्श निर्माण केला आहे. “ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे व गावाचे देणे लागतो” या भावनेतून येथील भांडणे कै. ही. बी. देसले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर निलेश देसले यांनी सहलीचा अविस्मरणीय आनंद घडवून दिला.
मुंबई येथे वास्तव्य असलेल्या डॉ. आर. आर. पाटील यांच्या तिन्ही चिरंजीवांचा— डॉ. निलेश पाटील, डॉ. परेश पाटील आणि प्रा. पंकज पाटील—शिक्षण भांडणे येथेच झाले. गावची माती, शिक्षकांची माया आणि गावकऱ्यांची प्रेरणा यामुळेच आपण घडलो, या कृतज्ञ भावनेने त्यांनी पुन्हा एकदा आपुलकीचा ठसा उमटवला आहे.

सहलीची संपूर्ण जबाबदारी स्वखर्चाने!

भंडणे येथून मुंबई सहलीसाठी गेलेल्या 65 विद्यार्थ्यांचा राहणी, जेवण, नाश्ता, चहा-पाणी, संपूर्ण मुंबई दर्शन, याची व्यवस्था या तिन्ही भावंडांनी स्वतःच्या खर्चातून केली.
दरवर्षी शाळेची सहल मुंबईत गेली की देसले कुटुंब स्वतः विद्यार्थ्यांसोबत राहते, सेवाभावाने सर्व सुविधा उपलब्ध करून देते आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करते.

“आपणही समाजाचे देणे लागतो” — देसले कुटुंबाची कृतज्ञ भावना

डॉ. निलेश, डॉ. परेश व प्रा. पंकज यांची ही भावना गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
“या शाळेत शिकून आम्ही घडलो… त्या ऋणातून ही सेवा आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे” असे देसले बंधू म्हणतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे पाहिली आणि संस्मरणीय अनुभव घेतला. या सेवाभावामुळे देसले बंधू गावात आणि जिल्ह्यात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत.

सहल यशस्वितेसाठी शिक्षकांचा मोलाचा वाटा

या सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक एम. जे. पाटील, जीवन पाटील, सारंग पाटील, मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले.
या कार्याचे संस्थेचे अध्यक्ष साहेबराव खरखार, भबुतराव राव पाटील, डॉ. देवेंद्र पाटील, पांडुरंग माळी, तसेच भडणेचे पोलीस पाटील युवराज माळी यांनी कौतुक केले आहे.

चौकट
मुंबई येथे वेद फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. निलेश पाटील गोरगरिबांसाठी विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून नि:स्वार्थ सेवा देतात.
“गावाचे आणि शिक्षकांचे ऋण फेडण्याची हीच वेळ. विद्यार्थ्यांसाठी सहलीची सेवा करता आली, हे आमच्यासाठी आनंद आणि समाधान आहे.”
— डॉ. निलेश पाटील व क्रांती पाटील, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *