कर्मयोगातून संताजी महाराजांनी भक्तीमार्ग प्रशस्त केला – प्रा.बी.एन.चौधरी.  धरणगावात तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे जयंती साजरी :
1 min read

कर्मयोगातून संताजी महाराजांनी भक्तीमार्ग प्रशस्त केला – प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे जयंती साजरी :

Loading

कर्मयोगातून संताजी महाराजांनी भक्तीमार्ग प्रशस्त केला – प्रा.बी.एन.चौधरी.

धरणगावात तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे जयंती साजरी :

धरणगाव  प्रतिनिधी 
तेली समाजाचे संत संताजी जगदाळे महाराज यांनी संत तुकोबांची गथा रक्षण करुन गुरु-शिष्य परंपरेचा गौरव वाढविला आहे. संताजी महाराजांनी कर्मयोगातून भक्तीचा मार्ग प्रशस्त केला आणि समाजधर्म वाढह! विला. घाण्याला परमेश्वर मानून घाण्याचे अभंग रचले असे प्रतिपादन प्रा.बी.एन.चौधरी यांनी केले. तेली समाज पंचमंडळी आयोजित श्री संत संताजी महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड.वसंतराव भोलाणे होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी संताजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. पंचमंडळीचे अध्यक्ष कैलास चौधरी यांनी गायत्री मंत्राने कार्यक्रमाला प्रारंभ केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून त्यांनी समाजाच्या संघटनांवर आणि सुरु असलेल्या कार्यावर आपली भूमिका मांडली.
संताचे विचार हे सर्व समाजासाठी प्रबोधनाचे कार्य करतात. त्यातून समाज बांधवांनी एकत्र येवून समाज संघटन वाढवावे असे आवाहन प्रा. चौधरी यांनी केले. मंडळातर्फे लवकरच पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन ॲड.भोलाणे यांनी केले. आवाहन करण्यात आले. समाज बंधू-भगिनींनी सामुहीक पूजन वंदन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी डोंगर चौधरी, रतिलाल चौधरी, शालिग्राम भोलाणे, अशोक व्यवहारे, भरत चौधरी, भगवान चौधरी, पंढरीनाथ थोरात, रमेश थोरात, आत्माराम चौधरी, अरुण चौधरी, रमेश भोलाणे, विराग वाजपेयी, शांताराम फुलपगार. किशोर भोलाणे, भोजराज चौधरी, नामदेव चौधरी आणि समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ थोरात यांनी तर आभार प्रदर्शन पंच मंडळाचे सचिव संतोष चौधरी यांनी केले. जयंती कार्यक्रमाने श्री संताजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *