पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन
![]()
*पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन
अमळनेर
दिनांक 06 डिसेंबर 2025 पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. याप्रसंगी धनदाई महाविद्यालय येथील प्रा पावरा ,मारवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा डॉ विजय पाटील , एरंडोल महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा डॉ चिकाटे ,धरणगाव महाविद्यालयातील प्रा. डॉ संजय शिंगाने उपस्थित होते. विभाग प्रमुख प्रा डॉ जगदीश एस सोनवणे, प्रा डॉ एस आर चव्हाण सर, प्रा. डॉ.भरत खंडागळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ अनिता खेडकर व सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डी आर ढगे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थांनी डॉ बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण विनम्र अभिवादन केले.

