राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा! ,  मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट
1 min read

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा! , मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट

Loading

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा!

मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट

जळगांव प्रतिनिधी

जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा.
दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनात केलेल्या खालील मागण्यांना जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत असलेल्या सर्व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे याबाबत दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांना हे निवेदन देण्यात आले शिक्षक व शिक्षकेतर यांच्या खालील महत्त्वाच्या मागण्यांबाबत आपण व्यक्तीक्षः लक्ष घालून सदर मागण्या मान्य कराव्यात ही आग्रह पूर्वक विनंती करण्यात आली *
मागण्या
1.सरसकट सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण चे अट रद्द करणे.
2. दिनांक 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून त्या अनुषंगाने आयोजित केलेले समायोजन रद्द करणे.
3. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर निक्त सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
4. शिक्षक व शिक्षकेतर 10 20 30 वर्षाची आश्वासित वेतन योजना लागू करणे.
5. शिक्षण सेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायम नेमणूक करणे.
6. शिक्षकांवर लादलेले अशक्षक्षणिक कामकाज काढून घेणे.
7. शाळांमध्ये विविध उपक्रमांमधून होत असलेला एनजीओ चा वाढता हस्तक्षेप बंद होणे
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अण्णासाहेब श्री जे के पाटील अध्यक्ष शैक्षणिक व्यासपीठ जळगाव, श्री यू यू दादा पाटील समन्वय समिती अध्यक्ष,
एच जी इंगळे अध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शैलेश राणे सदस्य शैक्षणिक संस्था चालक संघटना व व कार्याध्यक्ष जुक्टो संघटना संभाजी आप्पा पाटील भाऊसाहेब श्री आर एच बाविस्कर नारायण आनंदा वाघ अध्यक्ष शिक्षण भारती जळगाव, आर एस चौधरी अध्यक्ष टीडीएफ जामनेर, नंदन वळींकार जिल्हाध्यक्ष जुक्टो संघटना जळगाव, सुधाकर ठाकूर अध्यक्ष जळगाव ग्रामीण, दिगंबर हेमराज पाटील जिल्हा संघटक शिक्षकेतर संघटना, आबा सिताराम पाटील टी डी एफ जामनेर , सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे राज्याध्यक्ष प्रयोगशाळा सहाय्यक संघटना, श्री डी ए पाटील टीडीएफ श्री गोपाळ रामकृष्ण महाजन जळगाव तालुका अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ, अरुण नारायण सपकाळे अध्यक्ष जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ, डॉ संजय राजधर निकम जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना, एस बी पाटील नूतन मराठा माध्यमिक विद्यालय जळगाव, जे पी सपकाळे अध्यक्ष भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघ, व्ही पी पवार कार्याध्यक्ष जळगाव जिल्हा शिक्षकेतर संघटना जळगाव, श्रीमती पुष्पा अवधूत पाटील उपाध्यक्ष टी डी एफ महानगर जळगाव, तुषार पाचपांडे वरिष्ठ लिपिक, किरण सुरडकर कनिष्ठ लिपिक, एस जी गोसावी वरिष्ठ लिपिक, वै न महाजन वरिष्ठ लिपिक, गौरव सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक, अमित कुमार परखड उपशिक्षक, व्ही बी पाटील उपशिक्षक, संभाजी देविदास अस्वार लिपिक, शरद वाघ लिपिक, योगेश भोईटे जिल्हाध्यक्ष शिक्षकेतर संघटना, विनोद सावळे उपशिक्षक, महेंद्र पाटील लिपिक, वाय डी कचरे लिपिक संदीप डोलारे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *