राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा  विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे.
1 min read

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे.

Loading

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे.

जळगाव | प्रतिनिधी
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांच्यासह संलग्न सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

या संदर्भात समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्य शासन यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सकारात्मक भूमिकेतून शाळा बंद न ठेवता शिक्षक काळी फीत लावून निषेध नोंदवत नेहमीप्रमाणे अध्यापन कार्य सुरू ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निवेदनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्णची अट रद्द करणे, १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेतील अन्यायकारक अटी रद्द करणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, १०-२०-३० वर्षांची आश्वासित वेतनवाढ योजना, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामकाज रद्द करणे तसेच शिक्षण सेवक हे पद रद्द करून थेट कायमस्वरूपी नेमणुका करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शासनाने या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. तसे निवेदन उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आले
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, समन्वय श्री तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष पी.ए पाटील, उपाध्यक्ष गोविंदा पाटील ,प्रा आर एस पाटील डॉक्टर मिलिंद बागुल, संतोष कचरे, प्रसिद्धीप्रमुख प्रवीण धनगर, दिनेश पाटील , प्रदीप सोनवणे, यु बी भिलाला, जी व्ही दांडगे, एस एन पटणे, जी.बी.देशमुख. मुकेश बोरोले व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *