जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा.*
![]()
*जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा.*
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनात केलेल्या खालील मागण्यांना जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत असलेल्या सर्व संघटना आम्ही जाहीर पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
*याबाबत दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीत सर्व घटक संघटनांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.* या वेळी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने मा.मुख्यमंत्री महोदयांना मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात येणार असून
शिक्षक व शिक्षकेतरांच्या खालील महत्वाच्या मागण्यांबाबत आपण व्यक्तीशः लक्ष घालून सदर मागण्या मान्य कराव्यात ही आग्रह पूर्वक विनंती करण्यात येणार आहे.
*मागण्या*:-
१. सरसकट सर्व शिक्षकांना टि.ई.टी. उत्तीर्णची अट रद्द करणे.
२. दि. १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करुन त्या अनुषंगाने आयोजित केलेले समायोजन रद्द करणे.
३. दि. ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
४. शिक्षक / शिक्षकेतर १०-२०-३० वर्षाची आश्वासीत वेतन योजना लागू करणे.
६. शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामकाज काढून घेणे,
५. शिक्षण सेवक पद रद्द करुन सुरवातीपासून शिक्षकांची कायम नेमणूक करणे.
७. शाळांमध्ये विविध उपक्रमांमधून होत असलेला एन. जी. ओ. चा वाढता हस्तक्षेप बंद होणे.


*जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी
उपस्थितीचे आवाहन*
जे.के.पाटील, एस. डी. भिरुड, बाळासाहेब पाटील, गोपाळ पाटील,एच. जी. इंगळे, साधना लोखंडे,
नंदन वळींकार, सुनील सोनार, शैलेश राणे , प्रदीप साखरे, अजय देशमुख ,
प्रदिप तळवेलकर, राजेश जाधव ,योगेश भोईटे, संदिप डोलारे,संजय निकमआर. आर. धनगर ,प्रदीप वाणी, सुनिल तायडे , सिध्देश्वर वाघुळदे ,अरुण सपकाळे, हरिष तळेले,
सल्लागार यु.यु. दादा पाटील,आर्.एच्.बाविस्कर , संभाजी अप्पा पाटील,
सी. सी. वाणी,
सौ. पुष्पा पाटील यांनी केले आहे.

