अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड
1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड

अमळनेर प्रतिनिधी

विप्रो कन्सुमर केअर अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पाच बूथ सुशोभीकरण करण्यात आले होते जेथे,शहरातील मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा सण साजरा केला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील पाचही मतदान केंद्रांचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले होते. रांगोळी, फुगे सजावट, सेल्फी पॉइंट, आकर्षक मंडप, तसेच लोकशाहीविषयक संदेश देणारी विविध थिम्स यामुळे मतदारांचे लक्ष वेधले गेले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर बंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नगरपरिषद सीईओ गणेश शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडली.

मतदान केंद्रांवर ‘स्त्रीशक्ती–लोकशाहीची प्रेरणा’, अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल ‘युवा शक्ती–मतदानाची ऊर्जा’, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ‘हरित शक्ती–पर्यावरणपूरक मतदान’ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, ‘अभिमान शक्ती–माझं मत, आरोग्यवर्धिनी केंद्र नगरपालिका पिंपरी रोड, माझा अभिमान’, आणि ‘जवाबदार शक्ती–मतदान म्हणजे कर्तव्य’ नगरपरिषद कार्यालयअशा पाच वेगवेगळ्या थिम्सवर आकर्षक सजावट आणि माहितीपर पोस्टर्स मतदार केंद्रावर लावण्यात आले होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढवण्यास मोठी मदत झाली.

मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी केंद्रांवरील सेल्फी पॉईंटवर फोटो काढत लोकशाहीबद्दलचा अभिमान व्यक्त केला. विप्रो कंपनी आणि आधार संस्थेच्या संयुक्त सहकार्याने हे सर्व उपक्रम पार पडले. मतदारांनी सजावट आणि जनजागृती उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.

या उपक्रमात विप्रोचे फॅक्टरी मॅनेजर विजय बागजीलेवाले, पर्चेस मॅनेजर मिलिंद मार्कंडे, फायनान्स ऑफिसर आनंद निकम, विचार मॅनेजर चेतन थोरात, वेलफेअर मॅनेजर सुधीर बडगुजर आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद प्रा. विजय वाघमारे तसेच टीम सदस्य दिपक संदानशिव, अश्विनी भदाणे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, तौसिफ शेख, दिपक विश्वेश्वर, योगिता पाटील, यास्मिन शेख, भावना सूर्यवंशी, उर्जीता शिसोदे, आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान अहिरे, वंदना पावरा, सोनल पावरा, संगीत मैलागीर, सीमा शेख, सोनी चव्हाण यांसह पंडित जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही खास योगदान दिले.

सुशोभीकरण केलेली केंद्रं, उत्साही मतदार, आणि जनजागृतीच्या नवनवीन कल्पना यामुळे अमळनेरमध्ये लोकशाहीचा उत्सव यंदा विशेष रंगतदार ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *