दातृत्व: आदर्श शिक्षक भावसार यांची जवानांसाठी ५१ हजारांची मदत स्व. लाल बहादुर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान” घोषणेप्रमाणे आदर्श योगदान; शेतकऱ्यांसाठीही पाठवली मदत
![]()
दातृत्व: आदर्श शिक्षक भावसार यांची जवानांसाठी ५१ हजारांची मदत
स्व. लाल बहादुर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान” घोषणेप्रमाणे आदर्श योगदान; शेतकऱ्यांसाठीही पाठवली मदत
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी सैनिकांच्या मदतीसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी तब्बल ५१,००० रुपये धनादेशाद्वारे दिल्ली येथे पाठवून पुन्हा एकदा दातृत्वाचा आदर्श सादर केला आहे.
या मदतीद्वारे भावसार सरांनी स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रसिद्ध घोषणेचा अर्थ प्रत्यक्ष आचरणात आणला की “जय जवान, जय किसान” म्हणजे जवान व शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात सरांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीत प्रत्येकी १०,००० रुपये पाठवले होते. त्यानुसार, सरांनी आतापर्यंत पंतप्रधान सहाय्यता निधीत एकूण १,९६,००० रुपये मदतीसाठी पाठवले आहेत.
सरांच्या या उदारदातृत्वाबद्दल आणि जवानांप्रती कृतज्ञतेबद्दल शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संतोष आणि आनंद व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या कृतीमुळे भावसार सर हे केवळ शिक्षक नसून समाजसेवक व दातृत्वाचे आदर्श म्हणूनही ओळखले जात आहेत.

