“ना पैसा… ना पक्ष… जनता माझा एकमेव पक्ष — सुनिल महाजन!”
1 min read

“ना पैसा… ना पक्ष… जनता माझा एकमेव पक्ष — सुनिल महाजन!”

Loading

“प्रामाणिकतेची शपथ… विकासाची ग्वाही — प्रभागाला हवी सुनिल महाजनांची साथ!”

प्रभाग 13 ‘ब’ मध्ये स्वच्छ आणि प्रामाणिक नेतृत्वाची नवी लाट — सुनिल दयाराम महाजन यांना वाढता जनसमर्थन

अमळनेर प्रतिनिधी —
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 ‘ब’ आज केवळ राजकीय संघर्ष नसून “सत्य, स्वच्छता आणि पारदर्शकतेचा लोकशाही प्रयोग” ठरत आहे. अनुक्रमांक 4, बॅट चिन्हाचे अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी घेतलेली स्टॅम्प पेपरवरील लोकप्रतिबद्ध शपथ मतदारांत अभूतपूर्व विश्वास निर्माण करत आहे.

महाजन हे सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबल, उच्चशिक्षित, आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उमेदवार. पोलीस सेवेत प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेची ओळख; सामाजिक प्रश्नांवर निर्भीड भूमिका; आणि तरुणांना सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्त्व—यामुळे त्यांची प्रतिमा ‘स्वच्छ आणि विश्वासू उमेदवार’ अशी झाली आहे.

ते म्हणतात,
“नेता पैशावर नव्हे, प्रामाणिकतेवर निवडला पाहिजे. प्रभागाचा विकास माझ्या वचनांवर नव्हे, माझ्या कामावर बोलेल.”

त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये मतदारांना भावणारी—

भ्रष्टाचाराविरुद्ध पूर्ण शून्य-सहनशीलता

कोणतीही दलाली, कमिशन किंवा मध्यस्थी न करण्याची ठाम ग्वाही

रस्ते, पाणी, गटार, लाईट, स्वच्छता—निकाल आधारित कामांची हमी

कामात त्रुटी आढळल्यास स्वेच्छेने राजीनाम्याची ऐतिहासिक घोषणा

“जनता ठरवेल, मी अंमलात आणेन” — वॉर्डातील जनतेच्या दबावगटासोबत काम करण्याची हमी

सुनिल भाऊंचा संपूर्ण परिवार, नातेवाईक व मित्रपरिवार गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रमपूर्वक प्रचार करत असून, मतदार बंधू-भगिनींनी प्रामाणिक नेतृत्वाच्या या लढ्यात त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

प्रभागातील नागरिक म्हणतात —
“अशी स्वच्छ, प्रामाणिक आणि धाडसी उमेदवारी पहिल्यांदाच पाहत आहोत. हा माणूस नक्कीच विकास करू शकतो.”

प्रभाग 13 ‘ब’ मध्ये सुनिल दयाराम महाजन यांच्या पारदर्शक नेतृत्वाची सकारात्मक लाट जोरात जाणवत आहे.

अपक्ष उमेदवार – अनुक्रमांक 4 | चिन्ह : बॅट
सुनिल दयाराम महाजन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *