सुषमाताई देसले – दहिवद–सारबेटा गटातील परिवर्तनाची ज्योत”
1 min read

सुषमाताई देसले – दहिवद–सारबेटा गटातील परिवर्तनाची ज्योत”

Loading

“सुषमाताई देसले – दहिवद–सारबेटा गटातील परिवर्तनाची ज्योत”

दहिवद–सारबेटा गटातील सामाजिक कार्य, जनहित आणि विकासाच्या दिशेने कार्य करणाऱ्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले–पाटील हे नाव फक्त उमेदवार म्हणून नव्हे, तर समाजसेवेचा प्रेरक दीप, परिवर्तनाची शक्ती आणि जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रतीक आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या संचालिका, सरपंच परिषद महाराष्ट्रच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा, आणि मा. राज्यपाल यांच्या हस्ते ‘आदर्श प्रथम लोकनियुक्त सरपंच’ म्हणून सन्मानित—अशा दर्जेदार ओळखीच्या ताईंनी दहिवद–सारबेटा गटातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात बदल घडवण्याचे कार्य केले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सुषमाताईंनी महिला आरोग्य संवर्धन, गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी, सॅनिटरी पॅड वितरण, पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापन करणे, तसेच दिवाळीसारख्या सणांमध्ये गरीब कुटुंबात फराळ वाटप करणे अशा कार्यांमध्ये स्वतःला झोकून दिले आहे. या सर्व कामांमुळे गावातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा झाली, जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आणि सामाजिक बांधिलकीचे सुव्यवस्थित उदाहरण तयार झाले.
दुष्काळ आणि पाण्याच्या तुटवडीच्या काळात ताईंनी लोकवर्गणी, स्वतःचा निधी आणि रात्रंदिवस श्रमदान करून गावाच्या चारही बाजूंना खोल तलाव खोदले. सोनखेड़ी–निमझरीसारख्या शेजारील गावांसाठीही विहिरींचा पाणीपुरवठा सुनिश्चित केला. या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन पाणी फाउंडेशनने दहिवद गावाला पुरस्कारासाठी निवड केले आणि सीईओ सत्यजीत भटकळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मान्यता दिली.
कोरोना काळात ताईंनी घरोघरी जाऊन जनजागृती केली, मास्क वाटप, सॅनिटायझर फवारणी, लसीकरणाची व्यवस्था आणि बाहेरून येणाऱ्यांचे नियंत्रण यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या दरम्यान एसपी वासुदेव देसले साहेबांचे कुशल मार्गदर्शन आणि देसले परिवाराची सामाजिक बांधिलकी व मदतीची वृत्ती नेहमीच पुढे राहिली. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये सुरक्षितता, विश्वास आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.
सुषमाताईंनी जिल्हा परिषद शाळा सन १८९३ च्या ऐतिहासिक इमारतीचा नूतनीकरण करून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सुविधा दिली. सागवान लाकडाच्या पाट्या, स्वखर्च व लोकसहभागातून शाळा उभी केली, ज्याचे उद्घाटन कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू आणि पोलीस उपाधीक्षक यांच्या शुभ हस्ते झाले. विद्यार्थ्यांचा सत्कार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत आणि सामाजिक रूढींपासून मुक्ती या सर्व कार्यांमुळे सुषमाताईंनी गावातील शिक्षण, संस्कृती आणि समाजसेवा यांना नवे जीवन दिले आहे.
सुषमाताईंनी विधवा व परित्यक्ता महिलांचा सन्मान, हळदीकुंकू कार्यक्रमातून आत्मविश्वास वाढवणे, व्यसनमुक्ती, भ्रूणहत्याविरोधी जनजागृती, “बेटी बचाओ–बेटी पढ़ाओ” अभियान यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये नेतृत्व केले. या कार्यामुळे ताईंना ५२ पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये राज्यपालांचा गौरव, पद्मश्री पोपटराव पवारांचा ‘आदर्श सरपंच’, लोकमतचा “पॉवरफुल वुमन”, “खानदेश रत्न”, “तेजस्विनी कर्तृत्व” यांचा समावेश आहे.
आज सुषमाताई जिल्हा परिषद दहिवद–सारबेटा गटात विजयी उमेदवार ठरण्याच्या मार्गावर आहेत. गावाच्या विकासात सोनेरी पाऊल टाकणाऱ्या, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाने प्रत्येक कार्यात पुढे राहणाऱ्या या ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाच्या हृदयातून सन्मान, आभार आणि हार्दिक शुभेच्छा उमटल्या आहेत.

(जाहिरात.)

 

 

 

 

 

 

 

 

सुषमाताई – नेतृत्व, प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाचे जीवंत प्रतीक!

सन्मान, पुरस्कारांनी उजळलेली सुषमाताई देसले,
महिला आरोग्य, फराळ वाटप आणि सामाजिक कार्याची ज्योत जळत राहिले.

पाणी तुटवडा दूर करून तलाव खोदले, पंधरा हजार झाडांची लागवड केली,
शाळा नूतनीकरण, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व मदत दिली.

कोरोना काळात जनजागृती, मास्क व सॅनिटायझर वाटप, सुरक्षिततेची काळजी घेतली,
दहिवद–सारबेटा गटात विजयी उमेदवार ठरणार व समाजाच्या विकासात सोनेरी पाऊल टाकणार.

सुषमाताईंच्या वाढदिवशी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होवो हीच संत गजानन चरणी प्रार्थना..

शब्दांकन
ईश्वर आर.महाजन
पत्रकार अमळनेर
भ्रमणध्वनी 98 60 35 29 60

(जाहिरात)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *