ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी शिक्षक,मुख्याध्यक यांची सहविचार सभा संपन्न. प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून समाजामध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक- उपायुक्त पंकज शिरसाट.
![]()
ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी शिक्षक,मुख्याध्यक यांची सहविचार सभा संपन्न.
प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार करून समाजामध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक- उपायुक्त पंकज शिरसाट.
ठाणे: कल्याण( प्रतिनिधी)रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चा पूर्व नियोजनासाठी पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,वाहतूक पी.आय.युवराज सरनोबत साहेब,रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मनिलाल शिंपी यांचा मार्गदर्शाखाली व विभागीय मार्गदर्शक माणिक पाटील,ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी जितेंद्र सोनवणे,उपजिल्हा समादेशक विनोद शेलकर,कल्याण डोंबिवली जिल्हा समन्वय अधिकारी अनंत किनगे,यांचा प्रमुख उपस्थितीत (आर एस पी) विषयाचा प्रचार व प्रसार करणे तसेच, RSP शिक्षक अधिकारी प्रशिक्षण बाबत नियोजन करण्यासाठी पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग तीन हात नाका ठाणे कार्यालयात सहविचार बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांनी मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा पथक तयार करणे, वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबद्दल माहिती देऊन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावरून समाजामध्ये वाहतूक सुरक्षा व वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार आणि प्रबोधन व्हावे या दृष्टिकोनातून ठाणे पोलिस आयुक्तालयातील शाळांमध्ये ५ वी ते ७ वी चा वर्गातून वाहतूक नियमांवर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे यासाठी कलाध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर बेंडाळे सर व विनोद शेलकर यांच्याकडे सर्व जबाबदारी देण्यात आली आहे.तसेच ८वी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रकल्प ( प्रोजेक्ट ) स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.प्रत्येक विभागातून पाच स्पर्धकांना पारितोषिक, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक विभागातून ३ संचलन पथक, व एक बँड पथक असे एकूण ३० पथकांमध्ये साकेत मैदान ठाणे येथे भव्य संचलन स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांनी दिली. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा पथक तयार व्हावे, विद्यार्थ्यांचा माध्यमातून समाजापर्यंत वाहतुकीचे नियम प्रत्येक घरात गेले पाहिजेत, आर एस पी पथकाचे कार्य आणि महत्व वाढवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांच्या आदेशानुसार व ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय देविदास महाजन साहेब व जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ.बाळासाहेब राक्षे यांचा मार्गदर्शनाखाली दिनांक 5 डिसेंबर २०२५ ते 7 डिसेंबर २०२५ यादरम्यान ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालय तीन हात नाका, ठाणे पश्चिम येथे आर एस पी शिक्षक अधिकारी यांचे प्रशिक्षण, विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) श्री.मनिलाल शिंपी, व श्री.दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले आहे. या प्रशिक्षणासंबंधी ऑनलाइन अर्ज भरणे, नोंदणी करणे, आर.एस. पी.अधिकारी गणवेश इत्यादी बाबतची सविस्तर माहिती विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर)मनिलाल शिंपी यांनी सविस्तर माहिती दिली. शाळेतआर एस पी हा विषय राबविन्यासाठी बालभारती कडून रस्ता सुरक्षा विषयाचे पाठ्यपुस्तकपुस्तक इयत्ता नववी व दहावीसाठी तयार करण्यात आले आहे.एसएससी बोर्डाचा या विषयाचा P-5 हा सांकेतांक आहे. इयत्ता पहिली ते दहावी हा विषय कसा राबवावा इत्यादी बाबत सविस्तर माहिती अनंत किनगे यांनी दिली.यावेळी होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल चा प्राचार्या श्रीमती यशोदा नाईक यांना शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
आर एस पी यूनिटचे मार्गदर्शक समाजसेवक श्री.माणिक पाटील, कलाध्यापक संघाचे कोकण विभाग अध्यक्ष, दिगंबर बेंडाळे, विभागीय समन्वय अधिकारी मनिलाल शिंपी, कल्याण डोंबिवली जिल्हा समन्वय अधिकारी अनंत किनगे, ठाणे जिल्हा अतिरिक्त समन्वय अधिकारी जितेंद्र सोनवणे,ठाणे उपजिल्हा समन्वय अधिकारी विनोद शेलकर,आर एस पी अधिकारी बबन पाटील,सुभाष गायकवाड, ओमप्रकाश धनविजय,सतीश पाटील, होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल चा प्राचार्या श्रीमती यशोदा नाईक शाळा/ महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक,उपस्थित होते .संपूर्ण बैठकीचे सूत्रसंचलन विनोद शेलकर यांनी केले.शिक्षक उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे जितेंद्र सोनवणे यांनीआभार व्यक्त केले.

