“अमळनेरच्या प्रभाग 15 अ मध्ये विजयाची नवी उमेद – प्रशांत मनोहर निकम!”
![]()
सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प – प्रशांत मनोहर निकम प्रभाग 15 अ मध्ये!
अमळनेर प्रतिनिधी –
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 15 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार अधिकृत उमेदवार म्हणून प्रशांत मनोहर निकम यांचा दमदार प्रचार सुरू आहे.
प्रशांत मनोहर निकम हे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रसिद्ध असून, सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते-नाली व्यवस्थेचे आधुनिकीकरण, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा केंद्रांसह नागरिकांच्या दैनंदिन गरजांची योग्य पूर्तता हे त्यांच्या प्राथमिक उद्दिष्ट आहे.
त्यांचा ठाम विश्वास सुयोग्य नियोजन, पारदर्शक कामकाज आणि प्रत्येक नागरिकाच्या सहभागात प्रभागाचा शाश्वत विकास साधणे हा आहे. युवक, महिला, जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांच्या प्रयत्नांचे केंद्रबिंदू आहे.
प्रशांत मनोहर निकम हे मितभाषी, अभ्यासू व उच्चशिक्षित असून, मराठा समाज सेवा संघ आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्यामुळे प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये त्यांचा उल्लेखनीय प्रभाव दिसून येत आहे.
मतदारांमध्ये चर्चेप्रमाणे, 2 डिसेंबरच्या निवडणुकीत प्रशांत निकम यांचा प्रचंड मतांनी विजय निश्चितच होणार आहे. प्रचार सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आणि उत्साह या यशाचे संकेत देत आहेत.
प्रशांत मनोहर निकम – जबाबदारीपूर्वक काम करण्याचा, सुव्यवस्था, सुविधा आणि सततच्या विकासाचा दृढ संकल्प. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये त्यांना मतदानाचा आशीर्वाद द्यावा, असे मतदारांमध्ये आवाहन आहे.

