संविधान स्वीकृती दिन: महिलांच्या मतांचा सन्मान व अधिकाराची गाथा”
1 min read

संविधान स्वीकृती दिन: महिलांच्या मतांचा सन्मान व अधिकाराची गाथा”

Loading

 


“संविधान स्वीकृती दिन: महिलांच्या मतांचा सन्मान व अधिकाराची गाथा”

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने मंगरूळ येथे संविधान स्वीकृती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिला सोबत छोटासा गप्पाटप्पा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये संविधान स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान स्वीकारते आणि त्यांचे मतही आदराने घेतले जाते, हे स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमात लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण योजना यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांचे महत्त्व मांडले गेले. यामुळे स्पष्ट होते की, हे सर्व उपक्रम संविधानाने महिलांच्या मतांचा सन्मान करत असल्यामुळेच शक्य झाले आहेत.

इतिहास पाहता, काही लोकांनी महिला मतदारांना अधिकार न देण्याचा आग्रह धरला होता, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या निर्णयप्रक्रियेत महिलांचा समावेश अनिवार्य असल्याचे ठामपणे सांगितले. घरातही अनेकदा महिला मताला किंमत दिली जात नाही, परंतु संविधानाने महिलांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून त्यांच्या मताला खरी प्रतिष्ठा दिली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना संविधानासोबत उभे राहण्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान मान्य करण्याचे आवाहन केले गेले. कार्यक्रमाचे आयोजन सुनंदा पाटील आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या सचिव, दर्शना पवार यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *