प्रत्येक घरातून उमटला विकासाचा विश्वास – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा विजय निश्चित!  प्रभाग 16 मध्ये अपक्ष उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…
1 min read

प्रत्येक घरातून उमटला विकासाचा विश्वास – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा विजय निश्चित! प्रभाग 16 मध्ये अपक्ष उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…

Loading

प्रत्येक घरातून उमटला विकासाचा विश्वास – महेश देशमुख आणि निलिमा पाटील यांचा विजय निश्चित!

प्रभाग 16 मध्ये अपक्ष उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…

अमळनेर प्रतिनिधी
– अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाची आणि समाधानाची नवी लाट वाहू लागली आहे. प्रभागातील नागरिक स्पष्टपणे सांगतात – “विकास हवा, समाधान हवे!” या भावनेने प्रभागातील प्रत्येक घर, वस्ती आणि मतदार उत्साही झाले आहेत. या संधीचा फायदा घेत अपक्ष नेतृत्व म्हणून प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख (छत्री) आणि प्रभाग 16 ‘ब’ मधून सौ. निलिमा विश्वनाथ पाटील (पंखा) यांच्या भोवती एकजूट आणि उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.
महेश देशमुख हे प्रभागातील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणारे, शांत, संयमी आणि प्रामाणिक नेते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत निस्वार्थी सेवा, लोकांशी थेट संवाद आणि जमीनदोस्त वृत्ती यामुळे त्यांना मतदारांमध्ये अपार लोकप्रियता मिळाली आहे.
निलिमा पाटील या प्रभाग सोळा मधील सामाजिक युवा कार्यकर्ते रवी पाटील यांच्या पत्नी आहेत तर त्यांच्या सासू या माजी नगरसेविका आहेत.. घरातूनच सामाजिक व राजकीय बाळकडू त्यांना मिळाले आहे
यां प्रभागासाठी अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. महिलांशी, युवांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात निलिमा पाटील प्रवीण असून, विकासासाठी त्यांची समर्पित भूमिका स्पष्ट दिसते. त्यांच्या कार्यशैलीची ताकद केवळ त्यांच्या व्यक्तिगत क्षमतेत नाही, तर पारिवारिक संस्कृतीतूनही येते. निलिमा पाटील यांचे पती रवी पाटील प्रभागाला सतत सेवा देत आहेत, तर त्यांची आई माजी नगरसेविका होती. या परंपरेने अपक्ष उमेदवारांना प्रचंड विश्वासार्हता आणि पाठिंबा दिला आहे.

प्रभागातील मतदारांचा सूर स्पष्ट आहे – “समस्यांना वास्तववादी आणि दीर्घकालीन तोडगा हवा.” या अपेक्षेने महेश देशमुख (छत्री) आणि निलिमा पाटील (पंखा) यांना प्रभागासाठी योग्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. प्रचारादरम्यान महिलांची मोठी उपस्थिती, युवांचा उत्साह, आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन यामुळे प्रभागात विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

प्रभाग 16 च्या प्रत्येक कोपऱ्यात एकच नारा ऐकू येतो –

> “या वेळी ठरलं निश्चित – महेश देशमुख (छत्री) – निलिमा पाटील (पंखा) यांचा प्रचंड विजय निश्चित!”

अपक्ष उमेदवारांची ही जोडी प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेणारी, विकासासाठी समर्पित आणि पारदर्शक नेतृत्व देणारी असल्याचे स्पष्ट करते. आता प्रभागातील मतदार विश्वास, अनुभव आणि कामगिरीवर आधारित निर्णय घेण्यासाठी सज्ज आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *