अमळनेर नगरपरिषद 2025: शिवसेना शिंदे गटाची मेगा प्रचारसभा प्रचंड उत्साहपूर्ण  शिरीषदादा चौधरींचा भावनिक आवाहन – “तुम्हीच माझे मायबाप!!” तुम्हीच मला न्याय देणार.
1 min read

अमळनेर नगरपरिषद 2025: शिवसेना शिंदे गटाची मेगा प्रचारसभा प्रचंड उत्साहपूर्ण शिरीषदादा चौधरींचा भावनिक आवाहन – “तुम्हीच माझे मायबाप!!” तुम्हीच मला न्याय देणार.

Loading

अमळनेर नगरपरिषद 2025: शिवसेना शिंदे गटाची मेगा प्रचारसभा प्रचंड उत्साहपूर्ण

शिरीषदादा चौधरींचा भावनिक आवाहन –
“तुम्हीच माझे मायबाप!!” तुम्हीच मला न्याय देणार.

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद 2025 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने भव्य मेळाव्याद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या सभेला संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, कृषी व शालेय शिक्षण मंत्री ना. दादासाहेब भुसे यांच्यासह शिवसेनेचे उच्चस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचा उत्कर्षबिंदू ठरला माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या भावनिक भाषणाचा. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले—
“माझ्या परिवाराचा या निवडणुकीत एकही उमेदवार नाही. पण प्रभागातील सर्व उमेदवार माझ्या परिवारातीलच आहेत. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे… तुम्हीही माझ्या पाठीशी उभे रहा.”

शिरीषदादांनी पुढे मनाला स्पर्श करणारे वास्तव मांडले—
“माझ्या वडिलांचे निधन झाले आहे… आम्ही पोरके झालो आहोत. तरीसुद्धा नगरपरिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी येथे यावे लागले. तुम्हीच मला न्याय देणार, तुम्ही मायबाप जनता आहात उमेदवारांसमोर नतमस्तक झाले ..आपण समजून घ्या… आणि या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना नगर परिषद निवडणुकीत निवडून द्या, त्यांच्या हाती सेवा करण्याची संधी द्या.”

विरोधकांच्या विधानांवर थेट हल्लाबोल करत ते म्हणाले—
“विरोधक आमच्या परिवारावर खालच्या पातळीची, लोकांचा गैरसमज निर्माण करणारी बेताल वक्तव्ये करत आहेत. परंतु अशा व्यक्तींना चौधरी बंधू आणि अमळनेरची जनता भिक घालत नाही! चौधरी बंधू कधीच संपू शकत नाहीत, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.”
सभेतील प्रचंड गर्दीकडे पाहत त्यांनी सांगितले—
“अमळनेरकर जनता आमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे, हे इथल्या दृष्यांवरून स्पष्ट दिसते.”

पालकमंत्री गुलाबराव पाटीलांचा थेट टोला

सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदारांना स्पष्ट संदेश दिला—
“नगरपरिषदेसाठी स्वच्छ प्रतिमेचा, कर्तृत्ववान व्यक्ती निवडा. वैद्यकीय क्षेत्रातील स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार तुमच्यासमोर आहे. निर्णय आताच घ्या… नाहीतर पुढची पाच वर्षे सहन करावी लागतील. अशी वेळ येऊ नये म्हणून शिवसेनेचा भगवा फडकवा!”

संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांची हमी

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शहर विकासाची हमी देत सांगितले—
“अमळनेर शहर व तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून अमळनेरचा सर्वांगीण विकास जलदगतीने होईल.”

उपस्थित मान्यवरांचा पाठिंबा

सभेला नगरपरिषद निवडणुकीतील सर्व इच्छुक उमेदवार, चौधरी परिवाराचे समर्थक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उत्साहात उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती:

मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे, संसदीय गटनेते
ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री,ना. दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री,मा. वासुदेव पाटील, जिल्हाप्रमुख,मा. विष्णुभाऊ भंगाळे, जिल्हाप्रमुख,मा. सरिताताई माळी-कोल्हे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख,मा. रोहित कोगटा, युवासेना जिल्हाप्रमुख,अँड ललिता पाटील, नेत्या, अमळनेर,डॉ. प्रमिलागीरी गोसावी, आध्यात्मिक सेना,सुरेश अर्जुन पाटील, तालुका प्रमुख,शिरीषदादा चौधरी, माजी आमदार,डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर, उमेदवार,गुलाब काशिनाथ पाटील, माजी तालुका प्रमुख,चंद्रकांत कंखरे सर व जनता उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

सभेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ‘धनुष्यबाण’च्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला. वक्त्यांनी आगामी निवडणुकीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

शिरीषदादा चौधरी यांनी शेवटी उपस्थितांना भावनिक आवाहन केले—
“जनता माझी ताकद आहे. तुम्हीच न्याय द्याल, तुम्हीच निर्णय घ्याल.”
या मेगा शक्तीप्रदर्शनाने अमळनेरच्या राजकीय वातावरणात शिवसेनेचा जनाधार अधिक मजबूत झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *