अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान  बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान
1 min read

अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान

Loading

अमळनेरचा अभिमान: इंजि. गणेश ठाकरे यांचा बांधकाम क्षेत्रातील यशाचा प्रतिष्ठित सन्मान

बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशलतेचा गौरव, ‘सकाळ गौरवगाथा’त सन्मान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील प्रतिष्ठित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर इंजि. गणेश तुकाराम ठाकरे यांच्या कार्यकुशलतेचा सन्मान सकाळ समूहातर्फे आयोजित “सकाळ गौरवगाथा” कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
नाशिक येथील सोमा विनयार्ड रिसोर्ट येथे २४ तारखेला झालेल्या या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री भाग्यश्री चिरमुले आणि नाशिकचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या हस्ते इंजि. ठाकरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील आणि मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मारुती दातीर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
इंजि. गणेश ठाकरे यांनी राज्यभरात ३५ हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीरीत्या उभारले असून, केवळ बांधकाम क्षेत्रात नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे.
बांधकाम विभागातील उल्लेखनीय कार्य आणि मान्यताप्राप्त गौरव
बांधकाम विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गणेश ठाकरे काम करीत आहेत आणि त्यांच्या उत्कृष्ट कामाची अनेक वेळा दखल घेण्यात आली आहे. त्यांना अनेक पुरस्काराने अगोदरही सन्मान करण्यात आले आहे. बांधकाम विभागामध्ये त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. ठाकरे यांचे फक्त अमळनेर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. सदर सन्मान मिळाल्यामुळे अमळनेर तालुक्याचे सर्व क्षेत्रातून त्यांच्या अभिनंदन होत आहे.
सकाळ समूहातर्फे झालेल्या या विशेष गौरवामुळे इंजि. ठाकरे यांच्यावर मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची महत्त्वता अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *