सुनिल महाजनची पारदर्शक राजकीय शैली – प्रभाग 13 ब मध्ये मतदारांचा विश्वास जिंकलाः निशाणी बॅट”
![]()
“सुनिल महाजनची पारदर्शक राजकीय शैली – प्रभाग 13 ब मध्ये मतदारांचा विश्वास जिंकलाः निशाणी बॅट”
अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग 13 ब मध्ये निवडणूक रंगतदार होत असताना, अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांचे पारदर्शक आणि जनहितवादी प्रतिज्ञापत्र सर्वसामान्यांच्या चर्चेत आहे. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या आश्वासनांनी मतदारांमध्ये विश्वासाची नवी उमेद निर्माण केली आहे.
स्वेच्छा सेवेनिवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल, इतिहास विषयातील उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे महाजन यांनी त्यांच्या प्रतिज्ञांमध्ये भ्रष्टाचाराविरोधी ठाम भूमिका, कोणताही ठेका न स्वीकारण्याची निर्भीड घोषणा, वॉर्डातील मूलभूत सुविधांची शंभर टक्के पूर्तता, तसेच कामात कुचराई आढळल्यास पदाचा राजीनामा देण्याची धाडसी ग्वाही दिली आहे.
प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, रस्त्यावरील लाईट आणि सार्वजनिक स्वच्छता यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन देत त्यांनी म्हटले –
> “स्वच्छ, सुंदर अमळनेर – जनतेच्या सहभागाने उभारू.”
पारदर्शकता, प्रामाणिकता आणि जनतेला प्राधान्य देणारे हे प्रतिज्ञापत्र प्रभाग 13 ब मधील मतदारांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करत असून, या नव्या राजकीय शैलीची जोरदार चर्चा सुरू आहे.

