दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप
1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप

अमळनेर प्रतिनिधी) –
दि. २५/११/२०२५, मंगळवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे ताईसो. पुनम विकास जाधव (मंगरूळ, ता. पारोळा) यांचा वाढदिवस विशेष सोहळ्याने साजरा करण्यात आला.
या शुभ प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किराणा वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले. हा उपक्रम मा. श्री. डॉ. योगेश रघुनाथ महाजन (अध्यक्ष – चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे) आणि शाळेतील मुख्याध्यापक मा. श्री. मनीष किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
सोहळ्यात जाधव कुटुंबीय आणि मित्रपरिवार तसेच शाळेतील सर्व विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांनी या कार्यक्रमाला साजेसा उत्साह निर्माण केला.
हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य ठरले असून, समाजसेवेच्या या उपक्रमामुळे शाळेत एक आनंदमयी वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *