विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात
1 min read

विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात

Loading

विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शहापूर (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक युवराज सखाराम पाटील (वाय. एस. पाटील) हे समाजहिताची ओढ आणि सेवाभाव मनाशी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचे वयाच्या 76 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्यावर दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वर्गीय वाय एस पाटील हे ग्राम विकास शिक्षण संस्था (मुडी) संचलित कोळपिंप्री (ता. पारोळा), शिरुड, सारबेटे (ता. अमळनेर) येथील माध्यमिक विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे. त्यांना तीन मुले व एक मुलगी होती. मोठे चिरंजीव चंद्रकांत पाटील हे गांधली – पिळोदे येथील बालाजी विद्यालयात सहाय्यक शिक्षक तसेच प्रजाराज्य न्यूजचे पत्रकार आहेत. त्यांचे द्वितीय चिरंजीव महेंद्र पाटील हे सेल्वास येथील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. लहान चिरंजीव देवेंद्र पाटील हे माजी सैनिक असून सध्या जव्हार आदिवासी प्रकल्पाचे लिपिक म्हणून कार्यरत आहे. मुलगी संगीताबाई या विवाहित असून सध्या सुरत येथे वास्तव्यास आहे. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांनी समाजसेवेचा ध्यास कायम ठेवला होता. त्यामुळे ते 2008 मध्ये सेवानिवृत्ती नंतर आपल्या पत्नी कलाबाई यांच्या समवेत आपल्या मूळ गावी शहापूर (ता. अमळनेर) येथे वास्तव्यास गेले. त्यांनी गावासह परिसरात मोठा गोतावळा तयार केला होता. निधन होण्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी गावातील गौरेश्वर महादेव मंदिराचे नवीन फलक तयार करणे, तसेच अंत्ययात्रेसाठी आवश्यक तिरडी व खुर्ची भेट द्यावी असा संकल्प केला होता. परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. हा संकल्प पूर्ण होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, वडिलांच्या या अंतिम इच्छेला आकार देण्याचे काम त्यांचे तिन्ही पुत्र चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील व देवेंद्र पाटील यांनी भावनिकतेने पूर्ण केले. या कृतीमुळे त्यांच्या स्मृतींना सन्मान झाला आहे. त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी गावातील मंदिरात नवीन फलक बसविण्यात आले. तसेच अंत्ययात्रेसाठी आवश्यक साहित्य तिरडी व खुर्चीचे लोकार्पण करण्यात आले. दादाभाऊ भाऊराव पाटील. आधार बाबुराव पाटील , छगन मंगा पाटील , रघुनाथ सदाशिव माळी, डिगमल शामराव पाटील, ज्ञानदेव पंढरीनाथ पाटील यांच्यासह गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. निवृत मुख्याध्यापक आर टी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, “युवराज पाटील सरांनी आयुष्यभर इतरांसाठी विचार केला, शेवटी त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे विचार आणि कार्य आम्हाला प्रेरणा देत राहतील.”

“गेले ते देऊन शिकवण मोठी,
सेवेचा अर्थ समजवून गेले ओठी…”

अशा ओळींनी गावाने या समाजप्रिय शिक्षकाला अखेरचा निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *