प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित!
1 min read

प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित!

Loading

प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित!

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक वेगळीच हवा वाहू लागली आहे.
“ना कुठला झेंडा… ना कोणता पक्ष… जनता जनार्दन हा एकच पक्ष!”
हा नारा आज प्रभागातील प्रत्येक घर, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक मतदाराच्या मनात रुजलाय.
याच भावनेतून खरे अपक्ष नेतृत्व म्हणून प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील या दोन्ही उमेदवारांभोवती जोरदार एकीची लाट उसळली आहे.

अपक्ष जोडीची ताकद आणि पार्श्वभूमी

महेश देशमुख—
✔️ शांत, संयमी आणि लोकांच्या प्रश्नांवर तत्पर धाव घेणारे
✔️ प्रामाणिक, जमिनीवरचे आणि निस्वार्थी नेतृत्व

सौ. निलिमा पाटील—
✔️ महिलांच्या, युवांच्या आणि ज्येष्ठांच्या प्रश्नांवर मनापासून लक्ष
✔️ सर्वसमावेशक, सुसंस्कृत आणि विकासाला समर्पित व्यक्तिमत्त्व

या जोडीची ताकद फक्त स्वतःच्या कार्यशैलीत नाही, तर पारिवारिक संस्कृतीतूनही आहे. प्रभाग 16 मध्ये नेहमीच कार्यत्पर असणारे नीलिमा पाटील यांचे पती रवी पाटील नेहमीच प्रभागाला चोबीस तास सेवा देत आहेत. त्यापूर्वी त्यांची आई नगरसेविका होती आणि कुटुंबातील सामाजिक कार्याची परंपरा आता सुनेतून पुढे नेली जात आहे.
या वेळी सासू नगरसेविकेनंतर सुनेला नगरसेविकेची उमेदवारी मिळावी, यासाठी पती रवी पाटील यांनी स्वतः न लढता पत्नीला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रभाग 16 मध्ये विजयाची लाट निर्माण झाली आहे, आणि आजच अपक्ष उमेदवारांनी गुलाल टाकून साजरा करण्याची चर्चा प्रभागातील नागरिकांमध्ये जोरदार सुरू आहे.

मतदारांचा सूर एकच…

“नेता हवा जनतेचा… पक्षाचा नव्हे!”

प्रभाग 16 मध्ये नागरिक वर्षानुवर्षे अनुभवत असलेल्या समस्या—
— डबघाईला आलेले रस्ते
— पाणीपुरवठ्याचा ताण
— तुटलेल्या गटारी व नाले
— अंधारकोपऱ्यातील ओपन प्लेस
— सुशोभीकरणाच्या उणीवा
— दैनंदिन भेडसावणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणी

या प्रत्येक प्रश्नाला शेवटची समाप्ती हवी आहे…
आणि म्हणूनच मतदार ठाम विश्वासाने म्हणू लागले आहेत—

**“उपाय हवा… तोही खात्रीशीर!

आणि म्हणूनच—महेश देशमुख – नीलिमा पाटीलच योग्य निवड!”**

प्रभावी प्रचार… उत्साहात भरारी

प्रचारादरम्यान
— महिलांची मोठी उपस्थिती
— युवांचा उत्साह
— ज्येष्ठांचे मार्गदर्शन

यामुळे वातावरणात विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग 16 च्या प्रत्येक भागात एकच नारा घुमतो—

**“या वेळी ठरलं निश्चित—

महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!”**

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *