प्रभाग 16 ला हवे विकासाचे ठाम नेतृत्व – महेश देशमुख आणि सौ. नीलिमा पाटील!”, प्रचाराला मिळतोय मतदारांकडून प्रतिसाद
1 min read

प्रभाग 16 ला हवे विकासाचे ठाम नेतृत्व – महेश देशमुख आणि सौ. नीलिमा पाटील!”, प्रचाराला मिळतोय मतदारांकडून प्रतिसाद

Loading

“प्रभाग 16 ला हवे विकासाचे ठाम नेतृत्व – महेश देशमुख आणि सौ. नीलिमा पाटील!”

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील — या दोन्ही उमेदवारांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख आणि निस्वार्थ कामाची छाप नागरिकांच्या मनात खोलवर उमटली आहे.
आज प्रभागात “सेवा हाच धर्म… विकास हाच ध्यास” हा भाव प्रत्येक नागरिकाच्या मनात भक्कमपणे रुजला आहे.
तुटलेले रस्ते, पाण्याचे ताणलेले प्रश्न, अपूर्ण नाले, अंधारकोपरे असलेली ओपन प्लेस, मुलांसाठी आवश्यक सुशोभीकरण आणि दररोजच्या छोट्या-मोठ्या अडचणींमुळे प्रभाग त्रस्त आहे.

या सर्व समस्यांवर ठोस, कायमस्वरूपी तोडगा आणण्यासाठी नागरिकांच्या मनात एकच विश्वासार्ह पर्याय उभा राहिला आहे:

👉 “महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील”

नागरिकांचे मत स्पष्ट आहे:

> “काम करणारे, दाखवून देणारे, आमच्या गरजांच्या वेळी धावून येणारे नेतृत्व हवे… आणि म्हणूनच आमचा विश्वास विकासाच्या जोडीवर!”

प्रचारदौऱ्यात महिलांचा उत्साही सहभाग, युवांची ऊर्जा, आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन — यामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे.
प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली, प्रत्येक वस्तीमध्ये एकच आवाज घुमतो —
“या वेळी महेश देशमुख – नीलिमा पाटील… प्रचंड मतांनी विजयी करा!”

नागरिकांचा ठाम विश्वास आहे की:
✔️ प्रभागातील अपूर्ण रस्ते पूर्ण होतील
✔️ स्वच्छ पाण्याचा समस्या सुटेल
✔️ गटारी, नाले, ड्रेनेजची सर्व कामे मार्गी लागतील
✔️ ओपन प्लेसचे हिरवे आणि आकर्षक सुशोभीकरण होईल
✔️ युवांसाठी उपक्रम, महिला सुरक्षेसाठी सुविधा, आणि पारदर्शक कारभार सुनिश्चित होईल

प्रभाग 16 च्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या भविष्याची नवी वाट उजळण्यासाठी, मतदारांकडून ‘विकासरूपी आशीर्वाद’ देण्याचे आवाहन होत आहे.

“जनतेचा विश्वास – विकासाचा श्वास…
महेश देशमुख – नीलिमा पाटील यांना द्या विजयाची खास साथ!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *