“प्रभाग 16 अ विकासासाठी पुन्हा एक विश्वासू नेतृत्त्व – पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू) उमेदवार”
![]()
“प्रभाग 16 अ विकासासाठी पुन्हा एक विश्वासू नेतृत्त्व – पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू) उमेदवार”
अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 अ मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पाठबळ असलेल्या अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ राजेश बापू उमेदवार म्हणून उभे आहेत.
माजी नगरसेवक आणि अनुभवी नेतृत्व असलेल्या राजेश बापू यांनी म्हटले की, निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्व महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
प्राथमिक प्रकल्प आणि कामकाजाची योजना:
आर के नगर मधील मेनगेट रस्ता काँक्रिटीकरण करणे
गुरुकृपा, विद्याविहार आणि सुरभी कॉलनीतील रस्ते विकसित करणे
संताजी नगरमधील ओपन प्लेस रस्ते गटारी वीज अद्यावत करणे
आर के नगरचा मेन ओपन प्लेस सुशोभिकरण करणे
मार्केट मागील गुरुकृपा कॉलनी, भालेराव नगर, संताजी नगर रस्ते विकसित करणे
आमदार अनिल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग सोळा मध्ये 24 तासची पाईपलाईन राबवणे
मुंदडा नगर, सूरबी व विद्याविहार कॉलनीचा मेन रस्ता विकसित करणे


सर्व कॉलनी भागातील पाईपलाईनमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण आणि ओपन प्लेसचे सुशोभीकरण
माजी नगरसेवक म्हणून केलेली कामे:
आर के नगर मधील सोसायटी भागातील रस्ते व गटार विकसित
नवीन भालेराव भागात रस्ते व ओपन प्लेस सुशोभिकरण
पाटील गडीमध्ये विविध रस्ते काँक्रिटीकरण
गुरुकृपा कॉलनीतील रस्ते डेव्हलपमेंट
रवी नगरमध्ये रस्ते आणि मोठ्या खुल्या भूखंडावर कम्युनिटी हॉल बांधला
जुन्या भालेराव नगरातील ओपन प्लेस विकसित
प्रभागातील विविध भागात 24 तास पाईपलाईन, हायमास्ट सोलर व विविध योजना राबवल्या
राजेश बापू यांनी मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “मी प्रभाग 16 अ मध्ये उभा आहे, प्रचंड मतांनी विजयी होऊन जनतेच्या सेवेत पुन्हा काम करू इच्छितो. प्रभागातील प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडवणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.”
त्यांनी सांगितले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात माझी आवड असून, मागच्या काळात प्रभागातील लोकांसाठी अनेक लोकोपयोगी कामे मी केली आहेत. या कामांच्या जोरावरच प्रभागातील जनता मला प्रचंड मतांनी निवडून देईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

