उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार”
1 min read

उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार”

Loading

उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार”

अमळनेर प्रतिनिधी
काँग्रेसच्या विद्यार्थी पक्षातील तडफदार युवा नेतृत्व, मुंबई उच्च न्यायालयातील कुशल वकील आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले एडवोकेट कौस्तुभ सुनील पाटील यांना ‘मराठी लाईव्ह न्युज’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांच्या सततच्या अभ्यासू, उपक्रमशील आणि सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.
कौस्तुभ पाटील हे NSUI (विद्यार्थी काँग्रेस) चे महासचिव म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक सोयी, सामाजिक भान, आणि गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमांमुळे ते युवा पिढीचे प्रेरणास्थान बनले आहेत. काँग्रेस पक्षातील निष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी सातत्याने लोकाभिमुख काम करत उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून व्यंगचित्रकार व ज्येष्ठ पत्रकार प्रा. बी. एन. चौधरी उपस्थित होते.
उद्घाटक म्हणून मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून
नाशिक आदिवासी विकास मंडळाचे उपायुक्त कपिल पवार,नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील,नाशिक ग्रामीणचे DYSP वासुदेव देसले,मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी,युनियन बँकचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील,स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार
या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
एडवोकेट कौस्तुभ पाटील काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान आज मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील आणि मराठी लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक ईश्वर महाजन यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन करण्यात आला.
युवा पिढीच्या अपेक्षा, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या एडवोकेट कौस्तुभ पाटील यांच्या कार्याचा विशेष सन्मान म्हणजेच त्यांचा सततच्या समाजकार्यास असलेला सन्माननीय गौरव असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *