खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे
1 min read

खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे

Loading

‘खान्देश साहित्य संघ’ च्या जळगाव ‘जिल्हाध्यक्ष’पदी शरद धनगर, ‘जिल्हा सचिव’पदी उमेश काटे

अमळनेर प्रतिनिधी- खान्देश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार, कवी शरद धनगर तर जिल्हा सचिव पदी जेष्ठ पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली. खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी या दोघांची तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे.
जेष्ठ साहित्यिक डॉ. फुला बागुल, अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे, जेष्ठ साहित्यिक डॉ. सयाजी पगार, कवी कैलास भामरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य रत्नाताई पाटील, प्रा रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय सचिव रमेश बोरसे यांच्या हस्ते या दोघांना नियुक्तीपत्रक देण्यात आले.
शरद धनगर यांनी यापूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रमात सहभाग, नवी दिल्ली येथे साहित्य अकादमी आयोजित ‘साहित्योत्सव’ या राष्ट्रीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’, उस्मानाबाद येथे निमंत्रित कवी म्हणून सहभाग, अमळनेर येथे आयोजित ‘पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलना’च्या आयोजनात महत्त्वपूर्ण जबाबदारी, बेळगाव येथे आयोजित ‘मराठी भाषा साहित्य संमेलना’त निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे. तसेच उमेश काटे हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’च्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी अमळनेर येथे झालेल्या ’97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलना’त सूत्रसंचालन तसेच धुळे येथे झालेल्या ‘अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलना’त ही सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली आहे. ‘पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलना’च्या आयोजनातही ते सहभागी होते. या दोघांच्या कार्याची दखल घेत प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर जिल्ह्यास्तरीय कार्याची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी वाङमय मंडळ, पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय, शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच, ‘मसाप’ अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *