धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत!” — कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दीपक पाटील वाघोदेकर लवकरच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता
1 min read

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत!” — कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दीपक पाटील वाघोदेकर लवकरच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता

Loading

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढत!” — कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दीपक पाटील वाघोदेकर लवकरच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता

अमळनेर प्रतिनिधी :
उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दीपक पाटील वाघोदेकर यांना उ.बा.ठा. कडून उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत अंतिम निर्णय घेत उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती स्वतः दीपक पाटील यांनी दिली.
या उमेदवारीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चळवळ निर्माण झाली आहे. प्रभागात आजवर प्रस्थापितांमध्ये होणाऱ्या निवडणुकीची सवय असलेल्या नागरिकांना यावेळी “धनशक्ती वि. जनशक्ती” अशी थरारक लढत पाहायला मिळणार आहे.
दीपक पाटील म्हणाले—
“मी माझ्या वैयक्तिक हेतूसाठी राजकारणात उतरत नाही. ही लढत आहे शेतकरी बापासाठी! शेतकर्‍यांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सोडवले जावेत, म्हणून मी मैदानात उतरत आहे. धरणाला नक्कीच नवसंजीवनी देणार.”
तसेच ते पुढे म्हणाले—
“माझी उमेदवारी रोखण्यासाठी काही घटकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अशा दबावाने मी मागे हटणारा नाही. शेतकरी बांधव माझी ताकद आहे.”
दीपक पाटील यांच्या या वक्तव्यानंतर तरुण कार्यकर्त्यांमध्ये व शेतकरी वर्गात उत्साहाची लाट बघायला मिळते. प्रभागातील ग्रामस्थ आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन दीपक पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रभागात अनेक वर्षांपासून प्रस्थापित नेतृत्वामुळे संघर्ष झाला नसतांना, दीपक पाटील यांच्या प्रवेशामुळे ही निवडणूक इतिहास घडविणारी ठरणार, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *