“प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चिती!”  ,प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मधून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार उमेदवारी
1 min read

“प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चिती!” ,प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मधून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार उमेदवारी

Loading

प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चिती!”

प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मधून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांची दमदार उमेदवारी

अमळनेर प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव) मध्ये समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले दांपत्य सौ. पाटील स्वप्ना विक्रांत पाटील आणि विक्रम भास्करराव पाटील (माजी नगरसेवक) यांनी नागरिकांचा विश्वास आणि प्रेम पुन्हा जिंकण्यासाठी जनसंपर्काचा धडाका सुरू केला आहे.
श्रीकृष्णपुरा, वडचौक परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याची त्यांची सातत्यपूर्ण वृत्ती, लोकांशी जोडले जाण्याची क्षमता आणि प्रत्येक घरातली अडचण हीच माझी जबाबदारी, हा त्यांचा सिद्धांत प्रभागात सकारात्मक बदल घडवत आहे.
सौ. स्वप्ना ताई या हुशार, मितभाषी, समजूतदार आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या आहेत. समाजसेवा त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. महिलांच्या समस्या, युवकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्ते यांसारख्या विकासकामांसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.
यापूर्वीही दांपत्याने प्रभागातील अनेक उपक्रम राबवत विकासाचे ठोस पाऊल उचलले आहे.
यामध्ये विशेषतः—सार्वजनिक स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुधारणा,रहिवाशांच्या मागण्यांचे वेळेवर निराकरण,शासकीय योजनांचे प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे,महिलां व ज्येष्ठांना आवश्यक ती मदत या सर्व कार्याला विद्यमान आमदार अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ आणि माजी आमदार, कृषी भूषण साहेबराव पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असते असे माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांनी सांगितले.

“जनतेचा विश्वास, विकासाचा संकल्प… प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास!”

📞 संपर्क : ९५७९६२३९२३
सौ. पाटील स्वप्ना विक्रांत – प्रभाग क्र. १७ (अ – OBC महिला राखीव)
श्रीकृष्णपुरा, वडचौक – अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *