आनंद कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिवाळी अंक व पुस्तक स्पर्धा – लेखक आणि प्रकाशकांसाठी सुवर्ण संधी
1 min read

आनंद कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिवाळी अंक व पुस्तक स्पर्धा – लेखक आणि प्रकाशकांसाठी सुवर्ण संधी

Loading

*दिवाळी अंक व पुस्तक स्पर्धेचे आयोजन*

*डोंबिवली:* आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी अंक स्पर्धा आणि पुस्तक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिवाळी अंकस्पर्धेसाठी प्रकाशक वा संपादकांनी आपल्या २०२५ च्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती पाठवण्यात. तसेच पुस्तक स्पर्धेसाठी लेखकांनी किंवा प्रकाशकांनी आपल्या १ जानेवारी २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती पाठवाव्यात. पुस्तक स्पर्धा कथा, कविता, ललित, बालसाहित्य, संकीर्ण तसेच संपादित साहित्य अशा विविध विभागांसाठी असेल. लेखक एका पेक्षा अधिक विभागांमध्ये सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धकांनी पुस्तके व दिवाळी अंक १५ नोव्हेंबर २०२५ पूर्वी हेमंत आनंदा नेहते. ६०२, प्रांजली हाईट, लावण्या साडी सेंटरच्या वर, माऊली हॉटेल समोर, नांदिवली रोड, डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी ८७७९६४४९९२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *