साधेपणात रंगले शुभबंधन… मनस्वी–पारसच्या विवाहसोहळ्याने उमटवली प्रेम आणि संस्कारांची छाप!
1 min read

साधेपणात रंगले शुभबंधन… मनस्वी–पारसच्या विवाहसोहळ्याने उमटवली प्रेम आणि संस्कारांची छाप!

Loading

साधेपणात रंगले शुभबंधन… मनस्वी–पारसच्या विवाहसोहळ्याने उमटवली प्रेम आणि संस्कारांची छाप!

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ता.अमळनेर येथील शिक्षण संस्थेचे चेअरमन महेंद्रलाल मिश्रीलालजी कोठारी यांची नात, कै.हेमेंद्र व ज्योती कोठारी यांची द्वितिय कन्या कु.मनस्वी आणि नशिराबाद येथील के.सुरेंद्रजी व अनिताजी कुचेरिया यांचे सुपूत्र चि.पारसजी यांचा वांड्गनिश्चय (साखरपुडा)कार्यक्रम सोमवार ता.३ रोजी दु.२वा.बन्सिलाल पॅलेस अमळनेर येथे आयोजिलेला होता. महेंद्रलाल कोठारी हे स्वत: ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष असून,महाराष्ट्रात धार्मिक क्षैत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.नेमिचंद मिश्रीलाल कोठारी या नावाने मोठी व्यापारी पेढी गणली जाते. त्यांच्या परिवारात २७ सदस्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतलेली आहे.,.त्याचप्रमाणे..वर पक्षाकडील नशिराबादचे कुचेरिया परिवार देखील धार्मिक ,सामाजिक,व्यापारी क्षेत्रात अग्रेसर असून आदर्श शेतकरी आहेत.दोन्ही परिवार सधन असून ,,, त्यांनी लग्नातला भपकेपणाला व अवास्तव खर्चाला तिलांजली देऊन साधेपणाने विवाह करण्याचा समंतीने निर्णय घेतला..ऊपस्थित सर्व पाहुणे मंडळींनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.आणि साखरपुडा कार्यक्रमातच मंगलाष्टके व वरमाला कार्यक्रमाने लग्न सोहळा ऊरकला.रामदेव शर्मा व राजमल संचैती यांनी पौरोहित्त्य केले.प्रा.अरूण कोचर यांनी सुत्रसंचालन केले..या सोहळ्याला माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरिष चौधरी,कृऊबा समितीचे संचालक मंडळ,खाशि मंडळाचे पदाधिकारी,समस्त जैन समाज बांधव, कळमसरेचे सरपंच उपसरपंच,शारदा हायस्कूलचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.या स्तुत्त्य ऊपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *