राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाणलोट गावातील अभ्यास सहल संपन्न
![]()
राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाणलोट गावातील अभ्यास सहल संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
न्यू जनरेशन पाणलोट विकास प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 9 गावात पाणलोट विकास प्रकल्प सुरु आहे त्यामध्ये क्षमता बांधणी घटकांतर्गत उपजीविका संसाधन संस्था ( एलआरए) मध्ये प्रशिक्षण संस्था म्हणून राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर जि.जळगाव या संस्थेची निवड झाली आहे. त्यामध्ये वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे व जलसंधारण विभाग जळगाव यांच्या सहकार्यातून सदर प्रशिक्षण घेण्यात येत आहे यामध्ये जल व भुमी व्यवस्थापन संस्था छ.संभाजीनगर यांनी संस्थेचे प्रविण प्रशिक्षक तयार केलेले असुन त्या प्रविण प्रशिक्षक मार्फत ज्या गावातील उद्योग व्यवसाय करणारे बचत गट व उद्योग करणारे महिला आहेत तेथे अभ्यास सहल नियोजन करण्यात आले व ज्या ठिकाणी नेले त्या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेत माहीती देण्यात आली. सदर प्रशिक्षण अभ्यास सहलमध्ये भिलाली, एकतास, एकलहरे, पाडसे, शहापूर, कळमसरे, निम, तांदळी, खेडी, खर्दे, वासरे या गावातील बचत गट सदस्य यांना सदर अभ्यास सहल मध्ये सहभागी करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक मा.श्री.बी.एस.ढंगारे साहेब,जिल्हा समन्वयक श्री पुरुषोत्तम पाटील,पीआयए तथा तालुका कृषी अधिकारी मा.श्री. ठाकरे साहेब व पाणलोट पथक सदस्य( डब्लुडीटी) विनोद पाटील, मच्छिंद्र सोनवणे यांच्याकडुन सहकार्य मिळत आहे. सदर अभ्यास सहलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भुपेन्द्र महाले यांच्या नियोजनानुसार करण्यात आले आहे यामध्ये राष्ट्रविकास संस्थेमार्फत संस्थचे सचिव तुषार पाटील, नयना चौधरी ,अमोल बैसाणे, सिमा महाजन, विद्या पाटील, मनिषा बैसाणे,यांच्यामार्फत अभ्यास सहल ठिकाणी प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आले तसेच खोकरपाट व देवळी येथील उद्योग करणारे बचत गट सदस्य मार्फत देखील मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळाले.
सदर अभ्यास सहल मध्ये खोकरपाट येथे पाणी फौंडेशन अंतर्गत बचत गटातील महिलांना देण्यात आलेले गांडूळखत प्रकल्प , दशपरणी अर्क, दुग्ध व्यवसाय, पाण्यावर केलेले काम , शेंद्रिय भेंडी प्लाॅट व देवळी येथे बचत गट सदस्य मार्फत सुरु करण्यात आलेले मसाला उद्योग, साडी व्यवसाय, मका भरडा उद्योग विषयावर मार्गदर्शन मिळाले व माहीती देखील मिळाली म्हणून पुढील काळात सदर गावातील महिलांना उद्योग सुरु करण्यास चांगली मदत मिळेल
तर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुख्य लेखापाल महेश माकडे ,राहुल सुर्यवंशी, हिलाल पाटील, गोरख पाटील, दिलीप पाटील, उमाकांत बोरसे,मुकेश पाटील, यांनी सदर अभ्यास सहल नियोजन केले

