अमळनेरातील ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य सोहळा – वाचन, विचार आणि संस्कृतीचा संगम! , २७ वर्षांची ज्ञानयात्रा — ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशित!
![]()
अमळनेरातील ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य सोहळा – वाचन, विचार आणि संस्कृतीचा संगम!
२७ वर्षांची ज्ञानयात्रा — ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशित!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर या संस्थेला यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन श्री. सुनिलजी जगताप (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक) आणि श्री. भिमराव गोविंदराव महाजन (सर) (अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ज्ञानदीप ग्रंथालय हे शासनमान्य इतर ब वर्ग मान्यता असून उत्कृष्ठ वाचनालय म्हणून नावलौकिक आहे. अध्यक्ष श्री. भिमराव गोविंदराव महाजन (सर) यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, ग्रंथालयद्वारे सर्व वयाच्या वाचकांना ज्ञानवृध्दीसाठी वाचनाची सुलभ सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. ग्रंथालय आपली संस्कृती जोपासण्याचे व तो वारसा विचारांद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे कार्य करतात. त्यामुळे सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मोलाची मदत होते.
प्रमुख उदघाटक श्री. सुनिलजी जगताप (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक) यांनी सांगितले की संस्थेची भरभराट व्हावी म्हणून ज्ञानदीप ग्रंथालय कार्यकारी मंडळ सतत प्रयत्नशील असते. ग्रंथालयाचा उत्तम उपयोग व्हावा म्हणून वाचकांना-सभासदांना विविध वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिले जाते. श्री. सुहासजी रोकडे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव) यांनी देखील शुभेच्छा दिल्या. मा. आमदार शिरीषजी चौधरी यांनी रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन सोहळ्यास भेट देवून शुभेच्छा दिल्यात.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रा. शांताराम ओंकार महाजन, अँड. सुदाम श्रावण महाजन (उपाध्यक्ष), श्री. सुहास गोपीचंद देवकर (सहचिटणीस), प्रा. नारायण वामन खोडके, (संस्थापक सहचिटणीस), प्रा. देविदास सहादू लोहार (संस्थापक सदस्य), तसेच संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य श्री. शांताराम दोधू महाजन, श्री. राजेंद्र भास्कर महाजन, श्री. नरेश देविदास महाजन, प्रा. रविंद्र गंगाराम माळी, सौ. सुवर्णा राजेंद्र महाजन, सौ. मनिषा किरण सूर्यवंशी, श्री. जयेश रत्नाकर कापडणे, श्री. नरेंद्र भिमराव महाजन (ग्रंथपाल) यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तालुक्यातील विविध ग्रंथालयांचे संचालक आणि ग्रंथपाल उपस्थितीत होते. संस्थापक अध्यक्ष स्व
आण्णासाहेब भास्करराव तापिराम चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘
तळपता सूर्य’ या स्मरणिकेच्या फ्लिप बुकचे ऑनलाईन प्रकाशन देखील सर्व उपस्थितांच्या मोबाईल द्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. यशश्री महाजन-कापडणे यांनी केले. तर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन चिटणीस डॉ. राजेंद्र भिमराव महाजन यांनी केले.
फोटो कँप्शन
रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करतांना अध्यक्ष श्री. भिमराव महाजन (सर), प्रमुख उदघाटक श्री. सुनिलजी जगताप, डॉ.एस.ओ. माळी, डॉ. राजेंद्र महाजन, नरेश महाजन, सुहास देवकर, शांताराम महाजन, नारायण खोडके, देविदास लोहार, सुवर्णा महाजन, वंदना महाजन.


