जनआक्रोशातून संवादाची नवी दिशा!  कामतवाडी (रामेश्वर) ते कपिलेश्वर — “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान सुरू
1 min read

जनआक्रोशातून संवादाची नवी दिशा! कामतवाडी (रामेश्वर) ते कपिलेश्वर — “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान सुरू

Loading

जनआक्रोशातून संवादाची नवी दिशा!

कामतवाडी (रामेश्वर) ते कपिलेश्वर — “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान सुरू

अमळनेर प्रतिनिधी :
जनतेच्या मनातील असंतोष, शेतकऱ्यांचे जगण्याचे संकट, तरुणांचा रोजगाराचा संघर्ष आणि महिलांच्या सुरक्षिततेवरील प्रश्न — या सगळ्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने “गोवर्धन सुसंवाद पदयात्रा” आयोजित केली असून, ही पदयात्रा २१ ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कामतवाडी (रामेश्वर) येथून कपिलेश्वर येथे समारोप होणार आहे.

“हम चलेंगे हाथों में लेकर हाथ, अपनोंसे होगी सपनोंकी बात…” या संदेशासह सुरू होणारी ही यात्रा नांदेड, धावडे, सावखेडा, मुंगसे, रूधाटी, मठगव्हाण, पातोंडा, नांद्री, खवशी, खेडी, अमळगांव, मेहेरगांव, पिंगळवाडे, हिंगोणे बु., मुडी, करणखेडा, मारवड, गोवर्धन, कळमसरे, निममार्गे कपिलेश्वर येथे पोहोचेल.

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे – जनतेसोबत थेट संवाद, असंतोषाचा उद्रेक आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर थेट हल्ला!

आम्हा नागरिकांचा आता लागणार कस…”

काँग्रेस नेत्यांचा सरकारवर जोरदार प्रहार

“सध्या या देशात केवळ भांडवलदारांचाच विकास होतोय. सामान्य माणूस, शेतकरी, महिला, तरुण यांच्या प्रश्नांकडे सरकारने पाठ फिरवली आहे,” असा तीव्र शब्दांत आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या नावाखाली कंपन्यांना केंद्र सरकारने कोट्यवधींचे अनुदान दिले, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी नाही, असे सांगत कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले.

शेतीवरील खर्च केवळ २.९%
मागील सहा वर्षांत शेतीबजेटमध्ये २५% कपात, तर अनुदानात तब्बल ४८% घट! परिणामी खते, बी-बियाणे, कीटकनाशके महागली; पण उत्पादनाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या मार्गावर चालला आहे, अशी थेट आरोपांची झोड काँग्रेसने लावली.

तरुणांचा संताप : “रोजगार नाही, भविष्य अंधारात”

देशातील २७ कोटी लोक बेरोजगार असून ६० ते ८० लाख सरकारी जागा रिक्त आहेत. तरीही सरकार कंत्राटी कारभार आणून तरुणांना फसवत आहे, असा जनतेचा आक्रोश पदयात्रेत उमटत आहे.
तरुणांना पुन्हा जागवण्यासाठी “संवादच उपाय” असा संदेश यातून दिला जात आहे.

महिलांवरील अत्याचारांवर थेट हल्ला

महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
“मणिपूरसारख्या घटनेवर सरकार गप्प बसते, पण महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणून पैसे देऊन निवडणुका जिंकते,” असा उपरोधिक प्रहार महिलांनी केला.

सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठीचा संघर्ष

या पदयात्रेद्वारे काँग्रेस कार्यकर्ते प्रत्येक गावात प्रार्थना सभा, संवाद सत्रे आणि जनमतेचा आवाज घेऊन फिरणार आहेत.
“संविधानिक संस्थांवर हल्ला करणाऱ्यांना थारा नाही — ही पदयात्रा म्हणजे सत्तेच्या अहंकाराविरुद्धची लोकशक्ती आहे,” असा संदेश आयोजकांनी दिला.

यात्रेचे नेतृत्व
या “सुसंवाद पदयात्रे”चे नेतृत्व गांधीप्रचारक पदयात्री संदिप घोरपडे (सरचिटणीस, जळगांव जिल्हा काँग्रेस) करत असून, त्यांच्यासोबत
महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,
अमळनेर शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे,
बन्सीलाल भागवत,
भगवान सूर्यवंशी,
युवा अध्यक्ष महेश पाटील
आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जनतेच्या प्रश्नांवरून सरकार हादरवू!”

ही यात्रा फक्त चालण्याची नाही, तर जनतेच्या वेदना आणि सरकारच्या अन्यायाविरुद्धची क्रांती आहे.
“संवादच शक्ती आहे — आणि या सुसंवादातूनच परिवर्तनाचा मार्ग निघेल!” असा दृढ निर्धार पदयात्रेच्या घोषणेतून झळकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *