अमळनेर: सकल धनगर समाजाची भव्य बैठक व राज्यस्तरीय वधू-वरच्या मेळाव्याची तयारी
1 min read

अमळनेर: सकल धनगर समाजाची भव्य बैठक व राज्यस्तरीय वधू-वरच्या मेळाव्याची तयारी

Loading

 

अमळनेर: सकल धनगर समाजाची भव्य बैठक व राज्यस्तरीय वधू-वरच्या मेळाव्याची तयारी

अमळनेर प्रतिनिधी – सकल धनगर समाजाची बैठक शिव पेट्रोल पंप कार्यालयामध्ये भव्यरित्या आयोजित करण्यात आली. या बैठकीत धनगर समाज सेवा संघ, पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वऱ्यांच्या भव्य मेळाव्याची तयारी यशस्वी करण्यासाठी सर्व माहिती दिली गेली.
धनगर समाज सेवा संघ, पुणे यांच्या माध्यमातून धनगर समाजातील सर्व पोट शाखांतील वधू-वऱ्यांचा मेळावा 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित केला जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजातील एस.टी. आरक्षण, प्रगतीसाठीचे विविध प्रश्न तसेच समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपायांबाबत मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत व धनगर समाजाचे जेष्ठ नेते मा. हरचंद लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
याचसोबत बहुजन समाजाच्या सामाजिक प्रश्नांविषयी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नानासो मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत सकल धनगर समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मान्यवरांनी सल्ला व मार्गदर्शन दिले.
बैठकीला एस.सी. तेले सर, रमेश देव शिरसाठ, करणखेडा सरपंच गुलाबराव भागवत, प्रभाकर लांडगे, प्रदीप कंखरे, मुख्याध्यापक आनंदा हडप सर, ए.बी. धनगर सर, माजी सरपंच दिलीप ठाकरे, वासुदेव धनगर, भगवान बि-हाडे, सुशील पवार, दिनकर पाटील, पुणे येथील अभिनव कडू, रमेश सावळकर, सुहास राहींज, रमेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.सी. तेले सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ए.बी. धनगर सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *