जनतेच्या हक्काच्या विकासासाठी – सौ. सुषमाताई देसले मैदानात! ,
1 min read

जनतेच्या हक्काच्या विकासासाठी – सौ. सुषमाताई देसले मैदानात! ,

Loading

 


🚩 जनतेच्या हक्काच्या विकासासाठी – सौ. सुषमाताई देसले मैदानात! 🚩

 अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन)
दहिवद परिसरातील ओळख निर्माण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. सामाजिक कार्यातून जनतेच्या हृदयात घर करणाऱ्या सुषमाताई आता “जनतेच्या हक्काच्या विकासासाठी” पुढे सरसावल्या आहेत.

सुषमाताईंनी सामाजिक माध्यमांवरून आपला निवेदन प्रसिद्ध करताना म्हटले आहे की,

“मी आयुष्यभर लोकसेवा, सामान्य जनतेच्या अडचणी आणि विकासाच्या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं आणि त्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाय शोधणं हा माझा ध्यास आहे. आता या सेवेला अधिक व्यापक रूप देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची मनापासून इच्छा आहे.”

त्यांनी पुढे म्हटले की,

“ही केवळ निवडणूक नाही, तर आपल्या भागाच्या विकासाची, हक्काच्या प्रगतीची सुरुवात आहे. तुमचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.”

दहिवद परिसरातील महिला, युवक, शेतकरी आणि समाजातील विविध घटकांमध्ये सुषमाताईंची ओळख एक प्रामाणिक, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख नेत्या म्हणून आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव आणि जनसंपर्क यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुषमाताईंच्या नेतृत्वाखाली दहिवद व परिसरातील विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

🙏 आपलीच — सौ. सुषमाताई वासुदेव देसले, दहिवद
(जिल्हा परिषद सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवार) 🚩


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *