सर्वच क्षेत्रातील अस्पृश्यता संपविणे काळाची गरज संघटित शक्ती नसल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे मुकुंद सपकाळे
![]()
सर्वच क्षेत्रातील अस्पृश्यता संपविणे काळाची गरज
संघटित शक्ती नसल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे
मुकुंद सपकाळे
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय संविधानाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने माणूस,व्यक्ती केंद्रबिंदू मानला असून माणूसच आज धर्म,जात ,पंथ,राज्यवादात अडकला असून ही विचारधारा लोकशाहीची अडथळा असून हा अडथळा दूर करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील अस्पृश्यता संपवण्याची गरज असून संघटन शक्तीची आवश्यकता असल्याचे मत मुकुंद सपकाळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात निषेध आंदोलनाचे नियोजन बैठकी प्रसंगी व्यक्त केले.डॉ.अब्दुल करीम सालार,मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील,सुरेश चांगरे,सागर सपके, अय्याज अली नियाज अली,शेख अयुब नबी, ॲड.राजेश गवई, ॲड. अभिजित रंधे,जयसिंग वाघ,डॉ.मिलिंद बागुल,प्रा.सत्यजित साळवे प्रा.डॉ.सी.पी. लभाणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.प्रा.डॉ.सुरेश तायडे, ॲड.कमलाकर शिरसाठ, ॲड दीपक सोनवणे, उखर्डू सोनवणे, ॲड.आनंद कोचुरे, ॲड प्रज्ञाशील तायडे, ॲड.मुकेश कुरीर, अनिल सुरडकर, ॲड.प्रशांत बाविस्कर,प्रभाकर खर्चे,राजू सपकाळे यांनी सूचना केल्या. दिनांक १३/१०/२०२५सोमवार रोजी सकाळी ११वाजता आकाशवाणी चौक जळगाव येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस आधार सपकाळे,डी. एम.भालेराव, दिलीप जाधव, जगदिश सपकाळे,यशवंत घोडेश्वर, आनंदा तायडे,अशोक गाढे,मोहन दांडगे, शशिकांत हिंगोणेकर महेंद्र केदारे,दीपक बाविस्कर,विजय करंदीकर,सुभाष सपकाळे,साहेबराव बागूल, राजू सपकाळे, राजेंद्र सोनवणे,दिलीप सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला, सूत्र संचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार प्रा. प्रीतीलाल पवार यांनी मानले.

