आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्था, शिरपूर येथे ‘स्पोकन ट्युटोरियल’ परीक्षा यशस्वीरित्या संपन्न
![]()
आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्था, शिरपूर येथे ‘स्पोकन ट्युटोरियल’ परीक्षा यशस्वीरित्या संपन्न
शिरपूर प्रतिनिधी:
(वेदांत माळी)
(गौरव पाटील)
आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शिरपूर येथे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी एम.सी.ए. व 24 सप्टेंबर 2025 रोजी एम.सी.ए. इंटीग्रेटेड अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आयआयटी बॉम्बे स्पोकन ट्युटोरियल परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. ही परीक्षा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान शिक्षण अभियानाचा (NMEICT) एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
या परीक्षेचे आयोजन एम.सी.ए. विभाग आणि एमसीए (इंटिग्रेटेड) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. विविध अभ्यासक्रमांतर्गत जावा, पायथॉन 3.4, ड्रुपल, ॲन्ड्रॉयड व वेब डेव्हलपमेंट – बुटस्ट्रॅप या विषयांची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये एम.सी.ए. द्वितीय वर्षाचे 180 व एम.सी.ए. इंटीग्रेटेड अभ्यासक्रमातील 210 असे एकूण 390 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेब डेव्हलपमेंट आणि बूटस्ट्रॅप फ्रेमवर्क, जावा, पायथॉन 3.4, ड्रुपल या प्रोग्रामिंग भाषांविषयी तांत्रिक कौशल्य विकसित झाले. परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बे कडून प्रमाणपत्र दिले जाईल.
ही परीक्षा संस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कार्यक्रमाचे शैक्षणिक समन्वयन सहसंचालक आणि एमसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) विभागप्रमुख डॉ. मनोज बेहरे, तसेच आय.क्यु.ए.सी. समन्वयक, एम.एम.एस. विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल व पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल, आय.आय.टी. मुंबईच्या कु. विद्या कदम यांचे सहकार्य लाभले.
स्पोकन ट्युटोरियल समन्वयक प्रा. विठ्ठल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ही परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुचिता जाधव, प्रा. दिपाली न्हालदे, प्रा. राहुल बडगुजर, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. हर्षल भामरे, प्रा. श्रीयश पाटील, प्रा. हर्षदा चौधरी, प्रा. रोशनी बाविस्कर, प्रा. आयशा पिंजारी, प्रा. प्रेरणा पाटील तसेच संस्थेतील सर्व शिक्षकवर्गांचे सहकार्य लाभले.
संस्थेच्या संचालकांनी या यशस्वी आयोजनाबद्दल परिसंस्थेच्या संचालिका सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

