सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्‍या माथेफिरूवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
1 min read

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्‍या माथेफिरूवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Loading

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल करणार्‍या
माथेफिरूवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अकोला : भारताचे सर्वोच्च पदीr असलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात वकीली करणार्‍या राकेश किशोर तिवारी या धर्मांध उन्मादातून वकीलाने बुट फेकून मारला, हा देशाच्या अस्मीतेवर घाला घालण्याचे कृत्ये होय. देशात वाढती असहिष्णुता दर्शवणारे लोकशाहीचे अध:पतन करण्याचे, लोकशाही नाकारण्याचे दुष्कृत्ये होय.
सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर न्यायलयातच झालेला हल्ला हा केवळ वैयक्तीक नव्हे तर संपुर्ण संवैधानिक व्यवस्थेवरील आघात आहे. लोकशाही टिकवायची असेल तर न्यायव्यवस्थेचा सन्मान राखणे ़गरजेचे आहे आणि असहमती व्यक्ती करण्यासाठी सनदशिर मार्गाचा वापर करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. धर्मांधता, अंधश्रद्धा आणि राजकीय चापलूशी यांच्या मिश्रणातून निर्माण झालेली उन्मादी प्रवृत्ती देशासाठी व लोकशाहीसाठ घातक आहे. धाक निर्माण केला नाही तर यानंतर देशभरातील न्यायालयातील न्यायाधीश यांचेवर खुलेआम हल्ले होतील व हल्लेखोर मोकाट फिरल्यास देशात अराजकता माजेल यासाठी अशा धर्मांध व्यक्तीवर जातीयद्वेषातून न्यायमूर्ति मागासवर्गीय असल्याने हल्ला केल्याने त्याच्यावर *‘अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत तसेच देशाच्या अस्मीतेवर हल्ला केल्याने *‘देशद्रोहाचा’* गुन्हा दाखल करून वकीलीची सनद रद्द करण्यात यावी व त्याला जेलमध्ये टाकावे या मागणीकरीता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यकारिणीतर्पेâ निवेदन सादर.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार, सदस्य, पदाधिकारी यांच्या वतीने संघटनेच्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांचे मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अशोक शिरसाट, विजय सु. देशमुख, संतोष श्रीराम मोरे, रमेश समुद्रे (जिल्हा संघटक), नरेंद्र व्ही. देशमुख, गुलाम मोहसीन, डी. जे. वानखडे, अनिल मावळे, एजाज अहमद खान, संजय कृष्णराव देशमुख, दीपक शिरसाट, संघपाल सिरसाट, मनोज देशमुख सर, प्रा. सुरेश मोरे सर, पत्रकार शरद शेगोकार, राजेश सा. साठे, चांद रिझवी, इमरान खान, संपादक गजानन वानखडे यांचे सहीने (RDC) जिल्हाधिकारी यांचे मार्फत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना निवेदने देण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *