भिवंडीतील शिक्षकांसाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा”*
![]()
*”भिवंडीतील शिक्षकांसाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा”*
*ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) “सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स”* व *“युनिसेफ”* यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा विषयावर एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक आशान, पोलिस उपनिरीक्षक पगारे व रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कोनगाव (ता. भिवंडी) येथील आठगाव विद्यामंदिर शाळेत पार पडले.
या कार्यशाळेत जिल्हा परिषद शाळा तसेच विविध संस्थांतर्गत चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम शाळांमधील एकूण ४० शिक्षक-शिक्षिकांचा सहभाग होता. प्रशिक्षणात मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांची कारणे, वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर, वाहनांची देखभाल यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता वाढविणे व शाळा सुरक्षा समिती स्थापन करून शाळा परिसरातील त्रुटींचे ऑडिट करणे किती आवश्यक आहे, यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमास रस्ते सुरक्षा विभागाच्या आरएसपी शाखेचे ठाणे-पालघर विभाग प्रमुख श्री. मनिलाल शिंपी, कोणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. नेतराम मस्के व वरिष्ठ पोलिस अधिकारी श्री. अशोक दिलशान यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच युनिसेफचे कन्सल्टंट श्री. निलेश गंगावरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. संजय अस्वले यांनी आदेश काढून शाळांना सहभागाची सूचना केली होती. तसेच सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राइट्स संस्थेचे संचालक श्री. नितिन वाधवानी, श्रीमती लक्ष्मी जावीर, श्रीमती शीतल पटेल, श्री. विनायक पतकी, श्री. शिमोन खंडागळे व श्री. नकुल विशे यांनी परिश्रम घेतले.

