लायन्स क्लब अमळनेर आयोजित उदया तणाव व्यवस्थापन सेमिनार – मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी उपक्रम
1 min read

लायन्स क्लब अमळनेर आयोजित उदया तणाव व्यवस्थापन सेमिनार – मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी उपक्रम

Loading

लायन्स क्लब अमळनेर आयोजित उदया तणाव व्यवस्थापन सेमिनार – मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी – लायन्स क्लब, अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी भव्य तणाव व्यवस्थापन सेमिनार आयोजित केला जात आहे. हा सेमिनार रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५, सकाळी ९ वाजता सुजान मंगल कार्यालय, अमळनेर (जि. जळगाव) येथे पार पडेल.

या सेमिनारचे मुख्य पाहुणे व वक्ते डॉ. रोहन शाह, धुळे (मानसोपचार तज्ज्ञ) असणार आहेत. यावेळी सहभागी होणाऱ्यांना तणाव व्यवस्थापनाचे वैज्ञानिक उपाय, व्यवहारिक मार्गदर्शन आणि सोपी तंत्रे शिकण्याची संधी मिळणार आहे. तणाव हा सर्व वयोगटातील मूक साथीदार असून चिंता, नैराश्य, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदय रोग वाढवतो, तसेच कार्यक्षमता व आनंदी जीवनावर थेट परिणाम करतो. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांसाठी हा सेमिनार अत्यंत उपयुक्त ठरेल.

सदस्य मंडळात ला. प्रदीप जैन, ला. चेतन जैन (प्रोजेक्ट चेअरमन), ला. प्रशांत सिंघवी, ला. डॉ. संदीप जोशी (अध्यक्ष), ला. महेंद्र पाटील (सचिव) व ला. नितीन विंचूरकर (कोषाध्यक्ष) यांचा समावेश आहे. सर्व सदस्य लायन्स क्लब, अमळनेर यांच्या वतीने उपस्थितांना आग्रह करण्यात आला आहे की, चला एकत्र येऊन निरोगी व तणावमुक्त समाज घडवूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *