चि. अवनिशच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन – सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम”
![]()
“चि. अवनिशच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन – सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम”
पारोळा प्रतिनिधी
आज दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी (शनिवार) चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला.
सुमन केमिस्ट्री क्लासेसचे संचालक मा. श्री. हर्षल चंदुलाल बडगुजर व सौ. पूजा हर्षल बडगुजर यांच्या पुत्र चि. अवनिशच्या सातव्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. चंदुलाल बडगुजर, सौ. दिता बडगुजर, संचालक श्री. हर्षल बडगुजर व सौ. पूजा बडगुजर उपस्थित होते. तसेच सत्कार संस्था अध्यक्ष मा. श्री. समाधान कंखरे व अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या हस्ते वाढदिवसाचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सोनवणे यांनी केले तर शाळेची उद्दिष्टे व कार्याची माहिती मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी उपस्थितांना दिली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव जपण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरविला.


