कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.
1 min read

कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.

Loading

कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण (साहित्य शाखा) यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन २०२५ आणि ह.भ.प. श्री. लक्ष्मणबुवा आव्हाड दातलीकर त्यांचे स्मरणार्थ काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व समाजरत्न (साहित्य) पुरस्कार प्रदान सोहळा तसेच राज्यस्तरीय सहभागी कवींंचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

हा बहारदार साहित्यिक सोहळा येत्या रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता सार्वजनिक वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर, कल्याण (प.) येथे होणार आहे.

या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी कवी/ श्री. रविंद्र कांगणे राहणार असून, उद्घाटन मान्यवर ज्येष्ठ हिंदी कवीडॉ. विजय पंडित यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी/गीतकार श्री. अरुण म्हात्रे उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शंकरराव आव्हाड असून स्वागताध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर धात्रक हे आहेत.

समाजरत्न (साहित्य) पुरस्कार यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मा. श्री. एकनाथ आव्हाड, मुंबई यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच या संमेलनात निमंत्रित कवींचा कविसंमेलनाचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. यात विवेक उगलमुगले (नाशिक), जयश्री वाघ (सिन्नर), शिल्पा संखे (पालघर), दया घोंगे (डोंबिवली), अजित मालंडकर (कल्याण), रतन पिंगट (येवला), लता गुठे (मुंबई), भास्कर गीते (नांदेड) आदी नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी, कवितारसिक आणि वाचकांनी या ऐतिहासिक कवी संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून काव्यरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन साहित्य शाखेचे अध्यक्ष कवी रमेश आव्हाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *