खरीप हंगाम खलास – शेतकऱ्यांचे स्वप्न चिरडले, सरकार-प्रशासन मुकं!” प्रा.सुभाष पाटील
![]()
“खरीप हंगाम खलास – शेतकऱ्यांचे स्वप्न चिरडले, सरकार-प्रशासन मुकं!”
प्रा.सुभाष पाटील
अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम 2025 अक्षरशः ‘शेतकरीविरोधी’ ठरला आहे. पेरणी करून शेतकऱ्यांनी आशेने पिकांकडे पाहिले, पण जून-जुलैतील खंड, ऑगस्टमधील रोगराई आणि सप्टेंबरमधील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती “घरचा नाही घाटाचा नाही” अशी झाली आहे.
मूग, उडीद, मका, सोयाबीन केवळ 20% वर आले. 50 हजार हेक्टरवरील कापूस पिकावर ‘लाल्या’ रोगाचा फैलाव होऊन एकाच वेचणीनंतर कापूस उपटून टाकावा लागेल, अशी धक्कादायक परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे हातातून कापूस अक्षरशः निसटला आहे.
सर्वात गंभीर म्हणजे शेतकरी तक्रारी करूनही पंचनामे झालेले नाहीत! नजर आणेवारी चुकीची असल्याच्या शेकडो हरकती असूनसुद्धा अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नाही. शेतकरी रोज तहानलेला आहे, पण प्रशासन ‘बहिरं-आंधळं’ बनलं आहे.
“सरकारने पीकविमा रद्द केला, पण आम्ही मदत करू अशा घोषणा केल्या होत्या. आता ती मदत कुठे आहे? जिल्ह्यातील मंत्री-आमदार निवडणुकीत शेतकऱ्यांच्या दारी, पण संकटात मात्र गायब! शेतकऱ्यांचे आयुष्य खलास होत असताना हे लोक मौन धारण करून बसले आहेत,” असा तीव्र संताप व्यक्त करत प्रा. सुभाष पाटील यांनी पंचनामे तातडीने करून योग्य मदत द्यावी, अशी मागणी केली.
👉 शेतकरी आता प्रश्न विचारतोय : “आम्ही कसले पाप केले? आमचं पोट भरणार कोण?”


