एनएसयूआयचा जळगाव जिल्हा दौरा* : विद्यार्थ्यांशी संवाद, संघटन उभारणीवर भर
1 min read

एनएसयूआयचा जळगाव जिल्हा दौरा* : विद्यार्थ्यांशी संवाद, संघटन उभारणीवर भर

Loading

*एनएसयूआयचा जळगाव जिल्हा दौरा* : विद्यार्थ्यांशी संवाद, संघटन उभारणीवर भर

महाराष्ट्र एनएसयूआय प्रभारी मा. अक्षय यादव क्रांतिवीरजी व एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष मा. सागरजी सोळुंके यांच्या सूचनेनुसार मी नुकताच जळगाव जिल्हा एनएसयूआय निरीक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतरचा पहिला जिल्हा दौरा केला. या दौऱ्यात विविध शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

प्रतिनिधिक स्वरूपात जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पाल (ता. यावल) येथील सातपुडा विकास मंडळ संचलित विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाला भेट दिली. येथे मुला-मुलींशी थेट संवाद साधून त्यांना एनएसयूआयची ध्येय, धोरणे व संघटनात्मक कार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पुढील काळात महाविद्यालयनिहाय एनएसयूआय संघटन उभारणीसाठी सक्रीय योगदान देण्याचे आश्वासन दिले.

या दौऱ्यात विशेषतः खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली :

*संघटन बळकटीकरण* : महाविद्यालयनिहाय एनएसयूआय शाखांची उभारणी

*सदस्य नोंदणी* : विद्यार्थी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करणे

*शाखा उद्घाटन*: नियमित शाखा स्थापन व कार्यारंभ

*संघटनेस वेळ देणे* : कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सतत उपलब्ध राहणे

*वसतिगृह प्रश्न* : ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अडचणींवर ठोस पावले उचलणे

या कार्यक्रमाला घनशाम महाजन व त्यांचे सहकारी उपस्थित होते. दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा काँग्रेस नेते तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

एनएसयूआयच्या या जिल्हा दौर्‍यातून विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात जळगाव जिल्ह्यात संघटन विस्तार अधिक वेगाने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *