“संत साहित्यरत्न पुरुषोत्तम महाराजांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वरी उपक्रमाचे उदघाटन”
1 min read

“संत साहित्यरत्न पुरुषोत्तम महाराजांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वरी उपक्रमाचे उदघाटन”

Loading

 

*संत साहित्यरत्न ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांचे अध्यक्षतेखाली ओळख श्री ज्ञानेश्वरिची यां उपक्रमाचे रामकृष्ण हरीच्या जय घोषात नाशिक नंतर जिल्ह्या धुळे जिल्ह्यात अनेक विद्यालयात उदघाट्न.

धुळे प्रतिनिधी

कुसुंबा आश्रमशाळेत ओळख ज्ञानेश्वरी ची अंतर्गत विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे –
स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय . पिंपळनेर . संचलित केशव स्मृती प्राथमिक, मुक्ताई पोस्ट बेसिक माध्यमिक व कै. सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा ता .जि . धुळे येथे आज दिनांक 28 / 9 /2025 वार रविवार रोजी कुसुंबा आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना ओळख ज्ञानेश्वरी माऊलींची या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सु .संस्काराची पेरणी व अध्यात्माचे धडे गिरविण्यात आले .
जय हरि माऊली या
श्री माऊलींच्या कृपेने नाशिक जिल्ह्यातील शाळेमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीचा उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला.*आत्ता धुळे जिल्ह्यातील 4 आश्रम शालेतही राबविला गेला आहे आहे*. त्यात
1- केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा, कुसुंबा
2- माधव स्मृति आदिवासी आश्रमशाळा, समोडे ता. साक्री जि. धुळे .
3- व्ही . जे .एनटी आश्रमशाळा पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
4 – श्यामाप्रसाद मुखर्जी स्कुल पिंपळनेर ता. साक्री जि धुळे
वरील धुळे जिल्ह्यातील ४ शाळेमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीचे उपक्रमाला रविवार दिनांक २८ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली.
तरी माऊलींच्या ज्ञानभक्ती च्या पालखी मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शाळेंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर असून व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय आक्कासो उर्फ पुष्पलताताई संभाजीराव पगारे सर्व संचलक मंडळासहित उपस्थित होते आणि प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अर्जुन मेदनकर साहेब अध्यक्ष पत्रकार संघ आळंदी देवाची तसेच ,ह .भ. प .श्री पांचाळ महाराज ,ह .भ .प श्री प्रल्हाद महाराज भुईभार , समन्वयक सौ रेखाताई पाटील वरील मान्यवर संत महात्मे उपस्थित होते .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात संत वांगमयातील ज्ञानेश्वरीची व हरिपाठाची मानवीय जीवनात किती व कां गरज आहे यावर भर देतांना अनेक संत वांगमयातील दाखले देऊन शालेय जीवनात संस्काराची अत्यंत गरज आहे तरच तो भविष्यातील सुधरूढ व सक्षम नागरिक घडू शकतो असे अधोरेखित केले.
श्री कार्यक्रमाचे आयोजन प्राथ . विभाग मुख्याध्यापक श्री शेवाळे ए . एल. तसेच माध्य व उच्य माध्य .विभाग मुख्याध्यापक / प्राचार्य श्री गवळी .के .एस यांनी केले . सुत्रसंचालन प्रा श्री महीरे पी .बी . यांनी केले . कार्यक्रमाचे वृत्तलेखन प्रा श्री महाजन के व्ही यांनी केले . कार्यक्रमात प्रमुख अतिथी स्वागतगीत गायन व वादन श्री महाले के सी सर , श्री भामरे एम डी , श्री माळी एस टी फलक लेखन प्रा श्री पाटील वाय डी तसेच स्टेज नियोजन श्री विनोद सोनवणे व श्री ऋषीकेश पगारे यांनी केले . कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला ओळख ज्ञानेश्वरीची या ग्रंथाचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी वरील पुस्तके वाचून त्यांच्यावर परीक्षा घेण्याचे आयोजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आदरणीय अक्का साहेबांनी ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीचे कसे मूळ आहे याचे विवेचन करून दिले तसेच कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांचे दीप प्रज्वलीत करून विद्येची देवता सरस्वती संत ज्ञानेश्वर महाराज आणि संस्थेचे मुख्य संस्थापक स्वर्गीय बापूसाहेब उर्फ संभाजी पगारे यांचे प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली असून स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आणि.
कार्यक्रमात प्रत्येक शाळेच्या मुख्यध्यापकांसहीत सर्व शिक्षकवृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व संचालक मंडळ आणि इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते . कार्यक्रमाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ग्रन्थातील विश्व प्रार्थना असलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *