कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड  “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड .
1 min read

कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड .

Loading

कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड

“जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड .

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रांजनोली येथील
कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचे कुस्ती वीर जीत सुनिल भोईर (६३kg) व हर्षद प्रवीण चौधरी (६७kg), के. आर. मालदे इंग्लिश स्कूल चा ओम श्रीराम चौधरी (४८kg) यांनी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 2025-26 (१४, १७ व १९) वर्षाखालील मुले व मुली फ्रिस्टाईल व 17 व 19 वर्षे मुले ग्रीकोरोमन
स्पर्धा दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी
जय गावदेवी कुस्ती संकुल, प्रशिक्षण केंद्र, श्रीमलंगड रोड, चेतना स्कूल, च्या बाजूला गुलमोहर बंगला, पिसवली गाव, तालुका कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे आयोजक म्हणून कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस श्री. निलेश भगत यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
स्पर्धा प्रमुख म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. समीर सूर्यवंशी यांनी संपूर्ण स्पर्धा अत्यंत शांतता पूर्वक वातावरणात पार पाडली.
यावेळी राष्ट्रीय खेळाडू श्री. हरेश कराळे यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी क्रीडा पर्यवेक्षक कुस्तीवीर श्री.राजेश भगत साहेब,प्रसिद्ध योगा मास्टर हाडवैद्य वसंत साळुंखे यांचा प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत रांजनोली येथील
कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचे कुस्ती वीर जीत सुनिल भोईर (६३kg) व हर्षद प्रवीण चौधरी (६७kg) यांनीजिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे. त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष करसन ठाकरे,प्राचार्य सचिन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रा. हर्षद शेटे, प्रा. दयानंद कांबळे, प्रा. आर. आर. कसबे, प्रा. मयुरेश दळवी, आय टी विभाग प्रमुख प्रा.माधव कांबळे,प्रा.मनिषा यादव, प्रा.ऐश्वर्या चव्हाण,यांच्यासह विशाल सर,सौ.सोनाली पवार,स्वाती भोईर,विनायक ढोबळे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या मेहनतीमुळे आपल्या कॉलेज ला हे यश मिळाले आहे अशा शब्दात महाविद्यालयाचे एडमिन श्री. रुपेश तरे यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
जिल्हास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा 2025/26 जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक समीर सूर्यवंशी, यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाल्या. आमच्या महाविद्यालयातील खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने अतिशय कठोर मेहनत करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून हे यश संपादन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांची खरी मेहनत व जिद्द आहे. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. करसन ठाकरे यांनी विशेष अभिनंदन करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *