मोबाईल दुकानांवरील चोरी वाढली; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
![]()
मोबाईल दुकानांवरील चोरी वाढली; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील भागवत रोड वरील रुद्र मोबाईल येथे पत्रा कापून चोरी झाली असून व संगम 3 नावाचे मोबाईल चे दुकान टार्गेट करण्यात आले आहे मोबाईल दुकानात पुन्हा चोरी झाली असून आता पर्यंत अनेक मोबाईल दुकान टार्गेट झाले आहेत. मोबाईल व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आधीच व्यापारातील मंदी सतावत असून व्यापारात खूप मंदीची लाट आहे दुकानात झालेली चोरी व्यापाऱ्यांना अडचणीची ठरत आहे. पहिल्या चोरीची आणि आताची चोरीची पद्धत सेम पत्रा कापून झाली आहे.वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता व्यापाऱ्यांनी सतर्क राहून दुकानात किमती वस्तू व ग्राहकांचे मोबाईल ठेऊ नयेत तसेच शक्यतो दुकानात कॅमेरा बसवावा असे मोबाईल व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन यांनी भागवत रोड वरील चोरी झालेल्या दुकानांची पाहणी करतांना व्यापाऱ्यांना सांगितले आहे.यावेळी मोबाईल व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी दुकानदार उपस्थित होते व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असेही मोबाईल व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन यांनी सांगितले आहे.

