फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन*
![]()
📌 *फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन*
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना GDC Classes तर्फे फार्मासिस्ट प्रश्न संच बक्षीस म्हणून देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण प्रा.देवेश प्र. भावसार यांनी केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.अनिल बोरसे, श्री.ज्ञानेश्वर चौधरी व श्री.महेश सोनजे यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
पदवी व पदविका अभ्यासक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए.निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे

