संघर्षातून साकारलेले स्वप्न : जयेश चौधरी आयर्लंडमध्ये मास्टर डिग्रीसह यशस्वी”
1 min read

संघर्षातून साकारलेले स्वप्न : जयेश चौधरी आयर्लंडमध्ये मास्टर डिग्रीसह यशस्वी”

Loading

“संघर्षातून साकारलेले स्वप्न : जयेश चौधरी आयर्लंडमध्ये मास्टर डिग्रीसह यशस्वी”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेरच्या शिक्षणविश्वात आज एक प्रेरणादायी यशाची कथा प्रकट झाली आहे. श्री. एन. आर. चौधरी (मुख्या, माध्यमिक विद्यालय निंभोरा, ता. अमळनेर) आणि श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय, चोपडा) यांच्या कनिष्ठ चिरंजीव जयेश नारायण चौधरी यांनी Griffith College, Dublin, Ireland (यूरोप) येथून Master of Science in Pharmaceutical Business & Technology या अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण होऊन आपल्या मेहनतीचे फलित मिळवले आहे.
जागतिक स्तरावर उच्च रँकिंग असलेल्या Griffith College मध्ये प्रवेश मिळवणे हीच त्याची कष्टमय मेहनत, चिकाटी आणि धैर्य यांची प्रचिती आहे. जयेशच्या या यशाबद्दल समाज, मित्रपरिवार आणि परिसरातून मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक होत आहे.
जयेश हा आर. सी. पटेल महाविद्यालय, शिरपूर चे प्रिन्सिपल डॉ. डी. आर. पाटील यांचा भाचा असून, त्याच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस सर्व शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या प्रेरणादायी यशाची गाथा दाखवते की कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जगभरात नाव कमावणे शक्य आहे, आणि अमळनेरच्या तरुणांसाठी हा एक मार्गदर्शक उदाहरण ठरतो.
त्याचे अभिनंदन हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटीलसह  उपाध्यक्ष योगश्री पाटील, मा.अध्यक्ष दिपक पवार, आशिष शिंदे,मा.सचीव दिलीप पाटील, सहसर्व हिंदी मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *