शारदीय व्याख्यानमालेत अभिनेता-लेखक योगेश सोमण यांचे प्रभावी मार्गदर्शन
![]()
शारदीय व्याख्यानमालेत अभिनेता-लेखक योगेश सोमण यांचे प्रभावी मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प दि. २६ सप्टेंबर रोजी मराठा मंगल कार्यालयात दिमाखात गुंफण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. मान्यवरांचा सत्कार करून व्यासपीठाची शोभा वाढविण्यात आली.
प्रमुख वक्ते म्हणून सिने अभिनेता, लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण (मुंबई) यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका व सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा सौ. सुषमाताई वासुदेव देसले, तसेच डॉ. मयूरी संदीप जोशी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाने, सदस्य सौ. वसुंधरा लांडगे, प्रा. शिला पाटील, स्नेहा एकतारे, भैय्यासाहेब मगर व मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
उत्त्कृष्ट सुत्रसंचालन संदीपजी घोरपडे, नरेद्रजी निकुंभ यांनी केले.

