पैलाड येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा – आदर्श पालक दांपत्यांचा सत्कार
1 min read

पैलाड येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा – आदर्श पालक दांपत्यांचा सत्कार

Loading

पैलाड येथे पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा – आदर्श पालक दांपत्यांचा सत्कार

अमळनेर (ता. जळगाव) येथे आधार बहुउद्देशीय संस्था व व्हिटॅमिन एंजल्स यांच्या संयुक्त विद्यमाने पैलाड येथे जागतिक पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात महिलांच्या सक्रिय सहभागातून विविध पौष्टिक पदार्थांची प्रदर्शनी करण्यात आली. यावेळी पुरुष चॅम्पियन स्पर्धा घेण्यात आली. तसेच, बाळाला स्वतःहून लसीकरण करून घेणारे व अंगणवाडीत नियमित आपल्या पाल्याला आणणारे अशा दोन आदर्श पालक दांपत्यांची निवड करून त्यांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन दीप्ती गायकवाड व उषा पाटील यांनी केले होते. प्रमुख अतिथी म्हणून व्हिटॅमिन एंजल इंडिया समन्वयक गौरव चव्हाण, आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, तसेच टीम मेंबर अश्विनी भदाने व रत्नाबाई पाटील उपस्थित होते.

या वेळी पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहाराचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगिता पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *