ग्रामगौरव फाऊंडेशन च्या माध्यमातून कौतुकाची थाप , हा सन्मान नसून नवीन विचारांना चालना – सौ.जयश्रीताई पाटील
![]()
ग्रामगौरव फाऊंडेशन च्या माध्यमातून कौतुकाची थाप
हा सन्मान नसून नवीन विचारांना चालना –
सौ.जयश्रीताई पाटील
अमळनेर प्रतिनिधी
‘साक्षलक्ष्मी’ सन्मानामुळे भविष्यातील नवीन वाटचालीकडे जाण्यासाठी ची मोठी ऊर्जा प्राप्त झाली असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींच्या सन्मान करणाऱ्या ग्राम गौरव फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे यामुळे समस्त महिलांना नवी प्रेरणा मिळाली आहे या सन्मानाने आमची जबाबदारी वाढली असून यापुढेही समाजाप्रती उत्तरदायित्व निभावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असो असे प्रतिवादन जयश्री पाटील यांनी केले…
ग्राम गौरव फाउंडेशन च्या वतीने अंमळनेर येथील माजी मंत्री व विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या सौभाग्यवती जयश्री अनिल पाटील यांचा ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानचिन्ह,साडी-चोळी, खण -नारळाने ओटी भरण्याचा उपक्रम पार पडला यावेळी सन्मानाला उत्तर देताना,जयश्री पाटील यांनी ग्रामगौरव फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष धनश्री ठाकरे यांच्याकडून संस्थेच्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली
*निवासस्थानी स्वीकारला साक्षलक्ष्मी सन्मान*
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ मंदाकिनी भामरे,महिला शहराध्यक्ष, आशाताई चावरिया,जिल्हा महिला उपाध्यक्ष भारती शिंदे,शहर सचिव वैशाली ससाने,तसेच विविध महिला संस्थांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या
प्रारंभी ग्रामगौरव फाउंडेशनच्या संचालिका मनीषा ठाकरे यांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात सौ.दीपा बानाईत यांनी ओटी भरण केले यावेळी मंदाकिनी भामरे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कामांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.या पार्श्वभूमीवर ग्रामगौरव मीडियाच्या वतीने यावर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात जळगाव व पुणे जिल्ह्यातील सर्वात महिला प्रतिनिधी व मंत्री खासदार तसेच आमदारांच्या सौभाग्यवतींना महिला शक्तीचा जागर म्हणून ‘साक्षलक्ष्मी’ या उपक्रमाने राबवण्यात येत आहे ग्राम गौरव चे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीच्या नऊ दिवसात कार्यकारी संपादिका कुमारी धनश्री ठाकरे सहकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन सन्मान करत आहे.
सरते शेवटी साध्या व घरगुती समारंभात कार्याध्यक्ष धनश्री ठाकरे,संजय निकुंभ, अरुण इंगळे,योगेश भोई,योगेश पाटील, विशाल मैराळे, गणेश बाविस्कर,व दिपा बानाईत, मोनल मैराळे,यांच्या उपस्थितीत सौ.जयश्री पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

